गोंदे दुमाला येथील देवी मंदिर परिसरातील गाळ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 06:20 PM2019-10-01T18:20:50+5:302019-10-01T18:21:08+5:30
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर सरपंच शरद सोनवणे व सहकारी सदस्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे देवी मंदिर परिसरात झालेला गाळ जेसीबीद्वारे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
परिसरात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता पसरली होती. नवरात्रोत्सवानिमित्त येथे मोठी यात्रा भरत असल्यामुळे अनेक व्यावसायिक खेळणीचे दुकाने, पाळणे, प्रसादाची दुकाने थाटतात. गोंदे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने यात्रोत्सवाची जोरदार तयारी झाली असून, विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळ संध्याकाळ देवीची वाद्यांच्या गजरात आरती करण्यात येते.
इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुºहे, जानोरी आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. गाव परिसरातदेखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसाने अक्षरश: दाणादाण उडाली. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पाण्यात वाहून आलेल्या घाण, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
गोंदे दुमाला येथील भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात जेसीबीद्वारे साफसफाई करताना सरपंच शरद सोनवणे व सदस्य.
(फोटो २९ नांदर ३)