मेरी कें द्रावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:27 AM2019-10-22T00:27:24+5:302019-10-22T00:28:36+5:30
Maharashtra Assembly Election 2019 महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी) येथील मतदान केंद्रावर मतदारांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या ठिकाणी ८४, ८५ व ८६ क्रमांकाचे मतदान केंद्रांवर दिंडोरीरोड व मेरी परिसरातील नागरिकांचे मतदान होते.
नाशिक : महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी) येथील मतदान केंद्रावर मतदारांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या ठिकाणी ८४, ८५ व ८६ क्रमांकाचे मतदान केंद्रांवर दिंडोरीरोड व मेरी परिसरातील नागरिकांचे मतदान होते. मात्र याठिकाणी दुपारी ४ वाजेपर्यंत अतिशय संथगतीने मतदान झाले. दुपारच्या वेळी या मतदान केंद्रावर तर शुकशुकाट दिसून आला. शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्याने अनेक मतदारांनी मतदारयादीत आपले नाव शोधून मतदानाची स्लीप आपल्याजवळ घेऊन ठेवली होती. मात्र सायंकाळपर्यंत अनेकजण मतदानासाठी बाहेर पडले नव्हते. अखेर सायंकाळच्या सत्रात काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी या भागात फिरून मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केल्याने काही प्रमाणात मतदार बाहेर पडल्याने या भागात समाधानकारक मतदान झाल्याचे दिसून आले.