स्वदेशीच्या माध्यमातूनच ‘अच्छे दिन’

By admin | Published: September 20, 2015 10:34 PM2015-09-20T22:34:29+5:302015-09-20T22:35:40+5:30

योगदीक्षा शिबिर : विदेशीवर हल्लाबोल करीत रामदेवबाबांचा कर्मयोग करण्याचा सल्ला; सिन्नरला प्रचंड प्रतिसाद

'Good day' through Swadeshi | स्वदेशीच्या माध्यमातूनच ‘अच्छे दिन’

स्वदेशीच्या माध्यमातूनच ‘अच्छे दिन’

Next

सिन्नर : देशाला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेतच; मात्र नागरिकांनी स्वदेशीचा अवलंब केल्यास पैसा वाचेल. देशातील पैसा देशातच राहील. या पैशातून देशसेवा घडेल. त्यामुळे स्वेदशीच्या माध्यमातून ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन योगगुरू रामदेव बाबा यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयाच्या मैदानावर पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान न्यासच्या वतीने रामदेवबाबांच्या योगदीक्षा सभा व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ‘योग से राष्ट्र निर्माण’ या विषयावर बोलताना रामदेवबाबा यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले.
आयोजन समितीचे अध्यक्ष तथा आमदार राजााभाऊ वाजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योगदीक्षा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ंयावेळी मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, त्र्यंबकबाबा भगत, उदय सांगळे, निवृत्ती डावरे, सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, पांडू केदार, किसन आव्हाड, यशपाल आर्य, आनंद कर्नाटकी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नागरिकांनी पहाटे उठून योग करावेत आणि दिवसभर आपापला उद्योग व्यवसाय करावा. यालाच कर्मयोग म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने कर्मयोग करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मानवी शरीरासाठी ज्याप्रमाणे प्रोटिन, कॅल्शीयम व हिरव्या भाज्यांची गरज असते. त्यामुळे आपल्या मेंदूला योग व गायत्री मंत्राचा खुराक आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सकाळी लवकर उठून योग केल्यास आजारी पडून आपले नुकसान होणार नाही असे त्यांनी सांगितले. रोगी होण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी त्यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’चा मंत्र दिला.
संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या संत-ऋषींच्या भूमीत आपण जन्म घेतला असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले. आपले आचरण ऋषींसारखे असले पाहिजे असे ते म्हणाले. प्रत्यकाने शूरवीर बनण्याची गरज असून, कमजोर व भेकड असू नये असे त्यांनी सांगितले. काम करणारेच यशस्वी होतात. काम आणि मेहनत यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही वस्तू खरेदी करताना त्या देशी असल्या पाहिजे, असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला. विदेशी वस्तूंची किंमत जास्त असण्यासह त्यापासून देशाला कोणताही फायदा नसल्याचे रामदेवबाबा यांनी उपस्थिताना सांगितले. विदेशी कंपन्या देशाचा पैसा लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशी का विदेशी यातून नागरिकांनी योग्य पर्याय निवडावा, असे आवाहन त्यांनी केले. तन, मन अािण धन लुटणाऱ्या विदेशी उत्पादनावर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. सकाळी लवकर उठून योग करणे, निर्व्यसनी रहावे व स्वदेशीचा वापर असे तीन संकल्प प्रत्येकाने करावेत, असे आवाहन रामदेवबाबा यांनी केले. महाराष्ट्रातील सर्व व्यसने आजपासून आपण आपल्या झोळीत घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मरणानंतर कफनही स्वदेशीच असले पाहिजे असा आग्रह धरा, असे ते म्हणाले. कोणत्याही कामामुळे देशाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.(वार्ताहर)

Web Title: 'Good day' through Swadeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.