पारंपरिक भाषांना अच्छे दिन : पर्यावरण, कलाशास्त्रात शंभर नंबरी यश इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदीत विद्यार्थ्यांची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 01:19 AM2020-07-17T01:19:42+5:302020-07-17T01:20:30+5:30

नाशिक : विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत शिक्षण दिले जाणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह दृढ होत असल्याने देशातील पारंपरिक भाषांना अच्छे दिन आले आहेत.

Good days for traditional languages: 100 marks in environment, arts, Marathi, Hindi students better than English | पारंपरिक भाषांना अच्छे दिन : पर्यावरण, कलाशास्त्रात शंभर नंबरी यश इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदीत विद्यार्थ्यांची सरशी

पारंपरिक भाषांना अच्छे दिन : पर्यावरण, कलाशास्त्रात शंभर नंबरी यश इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदीत विद्यार्थ्यांची सरशी

Next

नाशिक : विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत शिक्षण दिले जाणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह दृढ होत असल्याने देशातील पारंपरिक भाषांना अच्छे दिन आले आहेत. बारावीच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेत विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन करून ही बाब अधोरेखित केली आहे, तर जागतिक स्तरावर पर्यावरण, कला संवर्धनाला महत्त्व प्राप्त झालेले असताना विद्यार्थ्यांचाही या विषयामधील रस वाढला आहे. बारावीच्या निकालात दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयात उत्तीर्ण होऊन शंभर नबरी यश संपादन केले आहे, तर शास्त्रीय संगीतासारख्या विषयात १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
भारतीय शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस अमूलाग्र बदल होत असून, इंग्रजीच्या मागे विद्यार्थ्यांची फरफट होत असल्याचे शिक्षण तज्ञ्जांच्या लक्षात अल्याने नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील अथवा विद्यार्थ्यांना आकलनास सोप्या भाषेत शिक्षण देण्यावर शिक्षणतज्ज्ञांनी भर दिला आहे. नेमकी हीच बाब बारावीच्या निकालतूनही समोर आली आहे. यापूर्वी इंग्रजी भाषेचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणारा विषय मानला जात असे. त्यामुळे मराठी, हिंदी भाषांपेक्षा इंग्रजीचा निकालही नेहमीच उजवा राहिला आहे. परंतु, यावर्षी इंग्रजीच्या निकालात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, त्यापेक्षा मराठी अणि हिंदीसारख्या पारंपरिक भाषेच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.

Web Title: Good days for traditional languages: 100 marks in environment, arts, Marathi, Hindi students better than English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.