चांगले आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवावे: नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:59 PM2019-08-20T22:59:53+5:302019-08-21T01:04:32+5:30

चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

Good ideals should always be kept in view: Nangare-Patil | चांगले आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवावे: नांगरे-पाटील

गोखले शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन करताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, आर. व्यंकटचलम, डॉ. मो. स. गोसावी, डॉ. राम कुलकर्णी, प्रणाली पंडित.

Next
ठळक मुद्देगोखले शिक्षण संस्थेचा शतकोत्तर महोत्सव सोहळा

नाशिक : चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
गोखले शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीनिमित्त जे.डी.सी. बिटको मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून नांगरे पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर. व्यंकटचलम हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.वाय.के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन मुग्धा जोशी व डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी केले. तर आभार डॉ. कविता पाटील यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. खंडेलवाल, उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, डॉ. सुहासिनी संत, विश्वस्त बी. देवराज, आर. पी. देशपांडे, शैलेश गोसावी, प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राम कुलकर्णी लिखित ‘आत्मसंवादातून स्वयंप्रेरणा’ या पुस्तकाचे तर एचपीटी महाविद्यालयाच्या ‘श्रद्धा’ व जे.डी.सी. बिटको महाविद्यालयाच्या ‘फूट प्रिंट्स’ या नियतकालिकांचे प्रकाशन झाले. तसेच संस्थेतील गुणवान विद्यार्थ्यांचा, पीएच.डी. प्राप्त अध्यापकांचा व सेवानिवृत्त प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Good ideals should always be kept in view: Nangare-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.