केवळ सात जणांच्या उपस्थितीत शुभमंगल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:28 PM2020-05-05T22:28:22+5:302020-05-05T23:19:53+5:30

मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती आलीच.. नवरीच्या कलवऱ्यांचं नटणं.. वरमायांचा मानपान.. तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी.. पण हे सगळं आता थांबलंय.. त्याला कारणही तसेच आहे..

Good luck in the presence of only seven people ...! | केवळ सात जणांच्या उपस्थितीत शुभमंगल...!

केवळ सात जणांच्या उपस्थितीत शुभमंगल...!

Next

मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती आलीच.. नवरीच्या कलवऱ्यांचं नटणं.. वरमायांचा मानपान.. तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी.. पण हे सगळं आता थांबलंय.. त्याला कारणही तसेच आहे.. सध्या सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि लॉकडाउनचा वरचष्मा.. पण या सगळ्यातही त्यांनी आपला लग्न सोहळा घरातच उरकला आहे.. अर्थात सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच..
मालेगावातील प्रसिद्ध व्यापारी नेमिचंद चोपडा यांचे चिरंजीव शुभम व नीलेश टाटिया यांची कन्या हिमानी यांचा विवाह अगदी साध्या पद्धतीने अवघ्या सात लोकांच्या उपस्थितीत घरातच पार पडला. सात जणांच्या उपस्थितीत घरातच शुभमंगल सावधान करत सोहळा पार पडला. सध्या संपूर्ण जगात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने देशात जमावबंदी आदेश आहे. जमावबंदी आदेशामुळे विविध सण-समारंभांवरदेखील बंधन आली आहेत. याचा परिणाम लग्न-समारंभदेखील झाला. पाल्याचा विवाह स्मरणात रहावा यासाठी अनेक पालकांनी यावर्षी ठरलेली विवाह तारीख रद्द करत पुढच्या वर्षी विवाह करण्याचे ठरविले. परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करत चोपडा व टाटिया परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला.
या विवाहासाठी भाऊबंदकी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना आमंत्रण न देता वधू व वराच्या आईवडिलांनीच पार पाडला. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाचे कौतुक होत असून, कॅम्प परिसरात एकच चर्चा आहे, ‘एक विवाह ऐसा भी’ या विवाहामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
------------------------
विवाहाची तारीख पूर्वी ठरलेली
होती. संचारबंदी असल्याने विवाह
पुढे ढकलण्याचा अनेकांनी सल्ला दिला.
शासन आदेशाचे पालन करून हौसमौजेला
फाटा देऊन घरातच विवाहाचा निर्णय
घेतला.
- नेमिचंद चोपडा, व्यापारी, मालेगाव

Web Title: Good luck in the presence of only seven people ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक