खूशखबर! नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडीच हजार कोटी 

By संजय पाठक | Updated: February 2, 2024 17:35 IST2024-02-02T17:34:16+5:302024-02-02T17:35:09+5:30

अर्थसंकल्प पावला, प्रवास 'हायस्पीड' होणार.

Good news 2 thousand crores for the proposed Nashik Pune railway | खूशखबर! नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडीच हजार कोटी 

खूशखबर! नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडीच हजार कोटी 

नाशिक : नाशिक - पुणे प्रस्तावित लोहमार्गासाठी गेल्या काही वर्षापासून केवळ चर्चाच सुरू हेाती. कधी या कामाला गती तर कधी फाईलींचा प्रवास देखील थांबत होता. मात्र, केंद्रशासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात यासंदर्भात नाशिक आणि पुणेकरांना खुशखबर असून तब्बल अडीच हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गेाडसे यांनी दिली. त्यामुळे लोहमार्ग उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.

नाशिक -पुणे -मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे. नाशिक पुणे थेट रेल्वे नसल्याने त्या तुलनेने नाशिकचा विकास मंदावलेला आहे. दरम्यान, नाशिक - पुणे रेल्वे कनेक्टसाठी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव पुढे आला होता. दरम्यान, नाशिक येथील रेल्वे ट्रॅक्शन परिसरात कोच दुरुस्ती आणि मेटनन्सचा कारखाना उभारणीसाठी रेल्वे बोर्डाने काही महिन्यांपूर्वी ४५ कोटी रूपयांच्या निधीला तत्वःता मान्यता दिली होती. अर्थसंकल्पात रेल्वे बोर्डाने सादर केलेल्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात कोच दुरुस्ती कारखाना उभारणीच्या कामासाठी १८ कोटी ८५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. या बरोबरच ट्रेन्शन परिसरात उभारण्यात येत असलेल्या व्हील रिपेरिग कारखान्यासाठीही तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.या तरतूदीमुळे याा दोनही प्रकल्पाचे काम वेगाने होणार असून रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळणार आहे.
 

Web Title: Good news 2 thousand crores for the proposed Nashik Pune railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक