टोमॅटोला चांगले दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 04:28 PM2020-08-24T16:28:32+5:302020-08-24T16:29:13+5:30

जानोरी : कोरोना महामारीमुळे शेतकरी पाच ते सहा महिन्यापासून आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु आता टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत आहे.परंतु हा भाव कायम टिकून राहतो की नाही याबद्दल शेतकºयांमध्ये शंकाच निर्माण झालेली दिसत आहे.

Good rates for tomatoes, satisfaction among farmers | टोमॅटोला चांगले दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान

टोमॅटोला चांगले दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान

Next
ठळक मुद्देकोरोना हा रोग आल्यापासून शेतकºयांना द्राक्ष पिकापासून तर अनेक पिकांमध्ये आर्थिक फटका

जानोरी : कोरोना महामारीमुळे शेतकरी पाच ते सहा महिन्यापासून आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु आता टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत आहे.परंतु हा भाव कायम टिकून राहतो की नाही याबद्दल शेतकºयांमध्ये शंकाच निर्माण झालेली दिसत आहे.
कोरोना हा रोग आल्यापासून शेतकºयांना द्राक्ष पिकापासून तर अनेक पिकांमध्ये आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकºयांनी यावर्षी जास्त खर्चाचे पीक न करता, सोयाबीन, मका, भुईमूग, डाळी मुंग, उडीद, या पिकावर जास्त शेतकºयांनी जोर दिलेला दिसत आहे. कारण कोरोनामुळे पिकांना भाव भेटतो की नाही या आशेने शेतक?्यांनी कमी खर्चाची पिके केलेले आहे.परंतु काही शेतक?्यांनी आपला जीव मुठीत धरून टोमॅटो हे पीक चांगल्या प्रमाणात लागवड केलीआहे . टोमॅटो या पिकाला एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकरी जास्त प्रमाणात हे पीक लावण्यास घाबरतो . कारण यावर्षी टोमॅटोला भाव भेटलंच कश्यावरुन हा प्रश्न शेतक?्यांनमध्ये पडला होता. त्यामुळे टोमॅटो लागवड यावर्षी कमी प्रमाण आहे. परंतु यावर्षी टोमॅटोला सरासरी चारशे ते पाचशे रुपये भाव असल्याने शेतकरी वर्गात समाधान दिसत आहे. सध्या परिसरात टोमॅटो पिकाचे कामे मोठया प्रमाणात चालू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये कोणी टोमॅटो बांधणी करणे, तार बांबू करणे, टोमॅटो खुडणे, औषधे फवारणी, खते टाकणे, असे अनेक प्रकारचे कामे शेतकरी करताना दिसत आहे. 

कोरोना महामारीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. परंतु सध्या टोमॅटोला चांगला दर असल्याने शेतक?्यांमध्ये थोडेफार का होईना समाधान दिसत आहे, पण हा भाव कायम टिकून राहिला तरच शेतक?्यांना कुठेतरी आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत होईल.
-विनोद काठे, शेतकरी, जानोरी.

Web Title: Good rates for tomatoes, satisfaction among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.