सोमवारी पंचवटी एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:19 AM2020-09-15T00:19:24+5:302020-09-15T01:32:13+5:30
नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेसला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ही एक्सप्रेस बंद होती. दोनच दिवसापूर्वी ती पुन्हा सुरू झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी एक्सप्रेस मधून मुंबईकडे रवाना झाले. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा पंचवटी पूर्वीप्रमाणेच प्रवासी घेऊन धावेल असे चित्र निर्माण झाले आहे.

रेल्वे प्रशासनाने संपूर्ण देशात 80 महत्त्वाच्या विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. त्यामध्ये पंचवटी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. शनिवार 12 सप्टेंबरपासून पंचवटी सुरु झाली. तेव्हा दुसरा शनिवार व रविवारच्या सुटीमुळे कमी प्रवासी आले. शनिवार व रविवार या दोन दिवसात सव्वातीनशे प्रवाशांनीच प्रवास केला. सोमवारपासून गाडीला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रवाशांना 90 मिनीटे स्थानकात अगोदर येऊन थर्मल स्क्रिनिंग करावे लागत आहे. कोरोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागत आहे. केवळ वैध/कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाचा प्रवेश देण्यात येत आहे. प्रवासाच्या नेहमीच्या नऊ तासापेक्षा तीन तास जास्त द्यावे लागत आहे. तसेच पासधारकांनाही सवलत नाही. त्यांना मासिक सात हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे पंचवटी कडे चाकरमान्यांनी पाठ फिरवली असावी असा अंदाज आहे. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी द्वारे मुंबई गाठली. मासिक पासधारकांना पूर्वीप्रमाणेच रेल्वे प्रशासनाने सवलत दिली तर पंचवटी एक्सप्रेस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.