अलविदा-२०२० बहुप्रतीक्षित बोट क्लबला अखेर मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:50+5:302020-12-31T04:15:50+5:30

----- नाशिक : गंगापूर धरणावर उभारण्यात आलेले राज्य पर्यटन विकास महामंडळाचे बोट क्लब नाशिककरांच्या सेवेत कधी येणार, याची प्रतीक्षा ...

Goodbye-2020 The much awaited boat club finally got the moment | अलविदा-२०२० बहुप्रतीक्षित बोट क्लबला अखेर मिळाला मुहूर्त

अलविदा-२०२० बहुप्रतीक्षित बोट क्लबला अखेर मिळाला मुहूर्त

googlenewsNext

-----

नाशिक : गंगापूर धरणावर उभारण्यात आलेले राज्य पर्यटन विकास महामंडळाचे बोट क्लब नाशिककरांच्या सेवेत कधी येणार, याची प्रतीक्षा केली जात होती. चालू वर्षी ही प्रतीक्षा संपली आणि अखेर बोट क्लब कार्यान्वित झाला. नाशिककर येथे अत्याधुनिक बोटींद्वारे साहसी जलक्रीडांचा आनंद लुटताना दिसत आहे. या बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे.----

एमटीडीसीचे ‘ग्रेप पार्क रिसॉर्ट’ही सेवेत

राज्य पर्यटन विकास महामंडळाने गंगापूर धरणालगत उभारलेले पंचतारांकित ‘ग्रेप पार्क’ रिसॉर्टदेखील यावर्षी नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध झाले. यामुळे नाशिकमध्ये परराज्यांसह विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा मुक्काम वाढीस लागणार आहे. या रिसॉर्टमध्ये २४ सुट, चार हेरिटेज सुट आहेत. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने २७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन या वास्तूचे उद‌्घाटन करण्यात आले.

---

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा ‘ब्रेक’

काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिकच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. पर्यटनाच्या माध्यमातून सुरू असलेले अर्थचक्र पूर्णपणे थांबले. एमटीडीसीचे सर्व रिसॉर्ट, निवास-न्याहारी केंद्रे कुलूपबंद होती. शासनाच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणामुळे या व्यवसायाला मोठा आधार मिळाला आणि पर्यटनाचा शहरासह जिल्ह्यात पुनश्च हरिओम झाला.

----

अभयारण्ये राहिली कुलूपबंद

नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत असलेले नांदूर मध्यमेश्वर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम ही सर्व अभयारण्ये सुमारे ८ महिने कुलूपबंद होती. या अभयारण्यात पर्यटकांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला होता. कोरोनामुळे अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी बंद झाल्याने स्थानिकांच्या अर्थार्जनावरही त्याचा परिणाम दिसून आला. नोव्हेंबर अखेरीस अभयारण्यांचे दरवाजे पर्यटनासाठी खुले करण्यात आले.

Web Title: Goodbye-2020 The much awaited boat club finally got the moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.