दिंडोरीत रोखला गुजरातेत जाणारा माल

By admin | Published: June 2, 2017 12:44 AM2017-06-02T00:44:51+5:302017-06-02T00:45:04+5:30

फळे बाजारपेठेत गेली नसून तालुक्यातून नाशिक, मुंबई, गुजरातला जाणारा शेतमाल पूर्णत: बंद झाला

Goods in Gujarat | दिंडोरीत रोखला गुजरातेत जाणारा माल

दिंडोरीत रोखला गुजरातेत जाणारा माल

Next

दिंडोरी : संपात दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने तालुक्यातून हजारो टन भाजीपाला, हजारो लिटर दूध, फळे बाजारपेठेत गेली नसून तालुक्यातून नाशिक, मुंबई, गुजरातला जाणारा शेतमाल पूर्णत: बंद झाला असून, बाहेरून येणारे दूध, भाजीपाला, फळे यांचीही वाहने ठिकठिकाणी अडविण्यात येऊन ते रस्त्यावरच रोखून ठेवण्यात आली आहेत.
शेतकरी संपाला मध्यरात्री सुरुवात होताच रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी नाशिक - सापुतारा, पिंपळगाव - सापुतारा, नाशिक - बलसाड या गुजरातला जोडणाऱ्या मार्गांवरून होणारी भाजीपाला, दूध, फळे यांची वाहतूक अडवली व संपावर तोडगा निघेपर्यंत मालवाहतूक थांबविण्याच्या सूचना देत वाहने सोडली.
दूध, फळे भाजीपाल्याची वाहने रोखली
दिंडोरी : सकाळी सहा वाजेपासूनच दिंडोरी सह ठिकठिकाणी रस्त्यावर युवक शेतकर्यांनी जमा होत वाहनांची तपासणी सुरू केली व भाजीपाला फळे व दुध वाहतुकीचे वाहने रोखून धरले कोणतेही नुकसान न करता वाहने बाजार आवारात लावण्यात आली त्यामुळे ठिकठिकाणी आंबे ,भाजीपाला व दुधाचे ट्रक अडकून पडले आहे.
दिंडोरी येथे नाशिक सापुतारा रस्त्यावरील पालखेड चौफुली वर शेकडो शेतकरी जमा होत त्यांनी येणार्या वाहनांची तपासणी सुरू केली यात तीन चार दुधाचे टँकर तर आठ दहा आंब्याची ट्रक एक टोमॅटो ची ट्रक अडवून ते बाजूला लावण्यात आले तर एक काळी पिवळी टॅक्सीत किरकोळ विक्र ीस नेण्यात येणारे आंबे,चिक्कू,नारळ आदी विविध फळे जप्त करत ते रस्त्यावर फेकून देण्यात आले. उमराळे येथे पेठ तसेच गुजरात मधून आलेले पंधरा ते वीस आंब्याचे ट्रक परत पाठविण्यात आले. रासेगाव,लखमापूर फाटा,उमराळे,पांडणे,वणी,खेडगाव,पिंप्री अचला आदी ठिकाणी भाजीपाला,फळे ,दुधाची वाहने रोखण्यात आली.तीनही प्रमुख राज्य मार्गावर ठिकठिकाणी वाहने रोखण्यात आली आहे.या आंदोलनात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी युवा शेतकरी आक्र मक झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला काही काळ तणाव निर्माण होत पोलीस व शेतकर्यांमध्ये वादविवाद झाला पोलिसांनी वाहतुकीला अडथळा न आणण्याची भूमिका मांडत कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले यानंतर कार्यकर्यांनीही समजुतीची भूमिका घेत येणाऱ्या जाणाऱ्यावाहनांवर लक्ष ठेवले. पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक के.टी. रंजवे ,मोहिते आदींनी चोख बंदोबस्त ठेवला

तीन लाख लिटर दुधाचे संकलन बंद

दिंडोरी तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून आठ कंपन्यांचे विविध गावात दूध संकलन केंद्र आहेत मात्र आजच्या संपात सहभागी होत शेतकर्यांनी डेअरी ला दूध न देण्याचा निर्णय घेतल्याने सर्व दूध संकलन केंद्र आज बंद होते .त्यात आठ शीतगृह प्रकल्प असून येथे दररोज सुमारे २ लाख ७५ हजार लिटरचे दूध संकलन होते मात्र आज एकही लिटर दुध जमा झाले नाही तर शहरात घरोघर दूध पोहचिवणाऱ््या शेतकर्यांनीही दूध पोहचवले आहे तालुक्यात संपूर्ण दूध विक्र ी बंद झाल्याने चाकरमान्यांना दुधाविना चहा पिण्याची वेळ आली आहे पॅकबंद दूध पिशवीचा पुरवठाही बंद होण्याची चिन्हे आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट
दररोज ताज्या भाजीपाल्याची प्रसिद्ध असलेला दिंडोरीतील भाजीपाला बाजारात आज शुकशुकाट होता भाजीपाला विक्र ेतेही संपात सहभागी झाल्याने त्यांनी दुकाने लावली नाही. भाजीपल्यासोबतच फळांचेही दुकाने बंद होते.

कृषी भांडारही बंद
दिंडोरी शहरातील सर्व कृषी औषधे बियाणे खते विक्र ी करणार्या व्यापार्यांनी या संपात सहभागी होत शेतकर्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
आज सर्व बाजारपेठ बंद
शेतकर्यांच्या संपास दिंडोरी व्यापारी असोशीयन ने पाठींबा दिला असून आज शुक्र वार रोजी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चिंचखेड येथे विनायकदादा पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन शेतकरी संपाच्या विरोधात विनायक दादा पाटील यांनी भूमिका घेतल्याचा समज करत चिंचखेड येथील शेतकर्यांनी त्यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.सरकार व पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या
खेडगाव येथे कडकडीत बंद
शेतकऱ्यांच्या शेतकरी संपाला खेडगाव येथे सर्व व्यावसायिकांनी पाठींबा देत सर्व व्यवहार बंद ठेवले.

सरकारच्या विरोधात रोष
शेतकरी संपावर जात असताना सरकारकडून शेतकर्यांच्या प्रश्नवर सकारात्मक निर्णय होत नसल्याने सरकार बद्दल जनतेत रोष व्यक्त केला जात असून त्यातच भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याने अजून रोष वाढत आहे.

Web Title: Goods in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.