वाहतूक कोंडीत गुदमरला श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:10 PM2020-01-25T23:10:32+5:302020-01-26T00:11:25+5:30

राष्टÑीय महामार्गाच्या एका बाजूला दाट लोकवस्तीत वसलेल्या सिडकोचा वाहतूक कोंडीत श्वास गुदमरू लागला आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांची वाढती संख्या पाहता सिडकोत अपघातांची मालिका सुरूच आहे.

Goodwill breathes in traffic congestion! | वाहतूक कोंडीत गुदमरला श्वास!

वाहतूक कोंडीत गुदमरला श्वास!

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातांची मालिका । अरुंद रस्ते, अतिक्रमण कारणीभूत

सिडको : राष्टÑीय महामार्गाच्या एका बाजूला दाट लोकवस्तीत वसलेल्या सिडकोचा वाहतूक कोंडीत श्वास गुदमरू लागला आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांची वाढती संख्या पाहता सिडकोत अपघातांची मालिका सुरूच आहे. मुख्य चौकात होणारी वाहतुकीची कोंडी व भाजी मार्केट परिसरातील गर्दीचा विचार करता सिडकोत सुरक्षित रस्ता वाहतुकीच्या शिकवणी ऐवजी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
सिडको भागातील दत्तमंदिर चौक, दिव्य अ‍ॅडलॅब, त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर या प्रमुख रस्त्यांवरून होणारी वर्दळ, अवजड व हलक्या वाहनांमुळे या रस्त्यांवर कायमच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या या रस्त्यांचे रुंदीकरण भविष्यात होणे अशक्य असले तरी, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उपाययोजना उपयोगी ठरू शकतात. त्रिमूर्ती चौकाजवळील पेठे शाळेच्या परिसरात मुख्य रस्त्यावरच भाजीबाजार भरत असून, याच रस्त्याने भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत असतात. यामुळे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. असाच प्रकार पवननगर व उत्तमनगर येथे सकाळी व सायंकाळी पहावयास मिळतो. शाळा व महाविद्यालयांमुळे हा रस्ता नेहमीच गजबजलेला असताना त्यातच रस्त्यावरील विक्रेते, रिक्षा, बसचा थांबा यामुळे पायी चालणेही मुश्किल होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व त्यातून अपघात ही नित्याची बाब झाली आहे. पवननगर चौकात मुख्य रस्त्यालगत जिजामाता भाजी मार्केट असून मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण तसेच भाजीबाजारालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. बाजारात येणारे ग्राहक हे त्यांची वाहने मार्केटच्या बाहेर उभी करीत असल्याने रस्त्याने येणाºया- जाणाºया वाहनधारकांना मार्ग काढणेदेखील कठीण होते.
सिडकोला लागूनच असलेल्या गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉल या मुख्य रस्त्यालगत कर्मयोगीनगर चौक रस्त्याने सिटी सेंटरकडे जाणाºया भागातही कायम अपघात होत असून, याठिकाणी गतिरोधक तसेच सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे आहे. संभाजी चौक, जुने सिडको, अंबड येथील एक्लो पॉइंट या भागातही वाहतुकीच्या समस्या आहेत. औद्योगिक वसाहतीत जाणाºया अवजड वाहनांची संख्या पाहता, त्यामानाने रस्ते अपुरे पडत असल्याने वाहतुकीची कोंडी व पर्यायाने अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत.

बोगदे वाहतूक कोंडीत
राष्टÑीय महामार्गावरून वाहने उड्डाणपुलाचा वापर करून थेट मुंबई वा धुळ्याकडे निघून जात असले तरी, नाशिक शहरात प्रवेश करणाºया वाहनांना पुलाखालूनच मार्गक्रमण करावे लागते. त्यासाठी राजीवनगर, लेखानगर, इंदिरानगर या ठिकाणी वाहनांना उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी बोगदे करण्यात आले आहेत. मात्र वाहनांची संख्या व बोगद्याचा आकार पाहता, या बोगद्यांच्या तोंडाशी कायमच वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यावर अनेक उपाययोजना केल्या गेल्या, परंतु कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही.

अवजड वाहनांची डोकेदुखी
सिडकोतूनच अंबड औद्योगिक वसाहतीत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. शिवाय औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारी बहुतांशी वाहने सिडकोतून मार्गक्रमण करीत असल्यामुळे त्याचा सिडकोतील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवर ताण पडतो. याशिवाय महामार्गाला लागून असलेल्या समांतर रस्त्यांवर दुहेरी वाहतूक सुरू असल्यामुळेदेखील बºयात वेळी अपघाताला आमंत्रण मिळते. या रस्त्यावर पायी चालाणाऱ्यांसाठी कोणतीही सोय नसल्याने पादचाºयांना कसरत करावी लागते.
रस्ता सुरक्षेला जेमतेम प्रतिसाद
अलीकडेच पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाला सिडको व परिसरात जेमतेम प्रतिसाद मिळाला. सुरक्षित रस्ता वाहतुकीबाबत जनजागृती करण्याऐवजी पोलिसांनी कारवाईवरच लक्ष केंद्रित केले. त्यामुळे अशा जनजागृतीचा कितपत लाभ होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Goodwill breathes in traffic congestion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.