गोपाळकृष्ण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

By admin | Published: October 29, 2016 12:01 AM2016-10-29T00:01:56+5:302016-10-29T00:02:53+5:30

लासलगाव : आकर्षक रांगोळ्यांनी शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

Gopal Krushna temple idol installation | गोपाळकृष्ण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

गोपाळकृष्ण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

Next

लासलगाव : येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्णमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी दत्तमंदिर ते संपूर्ण लासलगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यावर तसेच घरासमोर आकर्षक रांगोळ्यांनी यात्रेचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर रांगोळ्यांनी सजलेला बघायला मिळाला.  शोभायात्रेत मोठ्या संख्येने भजनी मंडळ, महिला वर्ग आणि भाविकांनी उपस्थिती दर्शविली. यानंतर मंदिरात गणपती पूजन, प्रदक्षिणा, हवन, अग्निहोमाचे आयोजन करण्यात  आले. यात नऊ जोडप्यांनी सहभाग घेऊन सत्यनारायण पूजाविधी पार पडला.   यावेळीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी काशीनाथ महाराज मोरे आळंदीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्र म झाला.  कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील समस्त बांधवांनी  कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बबन पाटील, कैलास पाटील, रवि होळकर, प्रकाश होळकर, विष्णुपंत निकम, सुरेश वडनेरे, चांगदेवदादा होळकर, अशोकदादा होळकर, संजय होळकर, धनंजय होळकर, युवराज पाटील, योगेश पाटील, गिरीश साबद्रा, विशाल पालवे, अशोक अग्निहोत्री, सुधीर झांबरे, गोपाळ भावसार, संदीप निकम, नवनीत पटेल, मनोज पटेल, अमित भावसार, सुरेश पिडीआर, प्रमोद पाटील आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्र माला महालेबाबा तसेच भजनी मंडळ लासलगाव, ब्राह्मणगाव, पिंपळगाव नजीक, विंचूर, गुंजाळवाडी, कोटमगाव, टाकळी, हनुमाननगर, वाहेगाव, वाकी, धारणगाव, मरळगोई येथील भक्तांचे सहकार्य लाभले आहे. (वार्ताहर)

Web Title: Gopal Krushna temple idol installation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.