गोपालकाला राष्ट्रीय एकतेचे प्रतिक
By Admin | Published: August 19, 2014 10:39 PM2014-08-19T22:39:53+5:302014-08-19T22:39:53+5:30
गोपालकाला उत्सवातून मैत्रीचे, समानतेचे, प्रेमाचे, बंधुत्वाचे व संस्कृतीचे सुरेख संगम साधल्या जात असल्याने हा सण राष्ट्रीय एकतेचे प्रतिक
सटाणा : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्यानुसार समाजातील तळागळापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्या थोर कर्मवीरांनी आपले सर्वस्व संस्थेच्या उभारणीसाठी अर्पण केले, त्या कर्मवीरांच्या कार्याला उजाळा देऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवत उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व दक्षिण सोसायटीचे अध्यक्ष मनोहर देवरे यांनी केले.
मराठा विद्याप्रसारक समाज संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय व डी. एम. तथा आप्पासाहेब देवरे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. बाविस्कर होते. मनोहर देवरे यांच्या हस्ते समाजाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास कोटबेल येथील सभासद अमृतराव खैरनार, जी. एम. बागुल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एस. भदाणे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. वंदना पाटील यांनी केले. यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सन २०१४च्या बी.एड. परीक्षेत कविता खैरनार (प्रथम), अरुण बागुल (द्वितीय), रूपाली अहिरे (तृतीय), कलावती थवील तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी प्रशांत अहिरे, राकेश बोरसे, भालचंद्र शेवाळे व केशव वेताळ यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. अभिजित गोसावी यांनी केले, तर आभार प्रा. दिनेश अहिरे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. समाधान सूर्यवंशी, श्यामकुमार कापडणीस, प्रा. नानासाहेब निकम आदिंसह विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते. (वार्ताहर)