Gopichand Padalkar: शरद पवारांवर पुन्हा खालच्या भाषेत टिका, पडळकरांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 07:37 AM2022-06-06T07:37:29+5:302022-06-06T07:38:43+5:30

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत पडळकरांनी शरद पवारांवर टिका केली. 

Gopichand Padalkar: Criticism of Sharad Pawar in low language again, Padalkar's tongue slipped | Gopichand Padalkar: शरद पवारांवर पुन्हा खालच्या भाषेत टिका, पडळकरांची जीभ घसरली

Gopichand Padalkar: शरद पवारांवर पुन्हा खालच्या भाषेत टिका, पडळकरांची जीभ घसरली

googlenewsNext

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने खालच्या भाषेत टिका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा एकदा जीभ घसरली. पडळकर हे नेहमीच खालच्या भाषेत शरद पवारांवर टिका करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत असतो. त्यातूनच, पडळकर यांच्या गाडीवर एकदा हल्लाही करण्यात आला होता. मात्र, पडळकर हे नेहमीच पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल करताना दिसून येतात. नाशिक येथील कांदा परिषदेत बोलताना दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत पडळकरांनी शरद पवारांवर टिका केली. 

'दोन वर्षापूर्वी विश्वासघातामुळे आम्ही विरोधी पक्षात बसलो. विरोधीपक्षात असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत. इतके वर्षे कांद्याचा प्रश्न का मिटला नाही. याच नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळेस, रक्त न सांडता शेतकऱ्यांनी इकडे येऊन शरद पवार यांच्या XXX वर लाथ घाला, असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पडळकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. तसेच, लाथ घातल्यानंतर शरद पवार बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा, मग ते शुद्धीवर येताच कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त विधान पडळकर यांनी केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी प्रहार केला. मुख्यमंत्री हे सध्या रिमोट कंट्रोलवर काम करत असल्याचं ते म्हणाले. 

चौंडीच्या कार्यक्रमावरुन पडळकरांची टिका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा झाली. यावेळी, त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांना आताच का चौंडी आठवली? ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एकदाही ते चौंडीला आले नाहीत. चौंडीला कार्यक्रम होतात ते पवारांना थेट २०२२ मध्येच कळले का? शरद पवार हे केवळ नातवाच्या प्रेमापोटी चौंडीला आले आहेत, असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
 

Web Title: Gopichand Padalkar: Criticism of Sharad Pawar in low language again, Padalkar's tongue slipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.