मालेगाव महानगरपालिका आयुक्तपदी गोसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 01:35 IST2021-04-21T01:34:52+5:302021-04-21T01:35:21+5:30
मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शासनाने भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त दीपक कासार यांना महासभेने अविश्वास ठराव आणून पायउतार केल्यानंतर २५ दिवसानंतर मनपाला आयुक्त मिळाला आहे.

मालेगाव महानगरपालिका आयुक्तपदी गोसावी
मालेगाव : महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शासनाने भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त दीपक कासार यांना महासभेने अविश्वास ठराव आणून पायउतार केल्यानंतर २५ दिवसानंतर मनपाला आयुक्त मिळाला आहे.
सध्या शहरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे, त्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी भालचंद्र गोसावी यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. नवनियुक्त आयुक्त गोसावी यांच्यापुढे बायोमायनिंग प्रकल्प, आउटसोर्सिंग ठेका, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आदी आव्हाने आहेत.