ब्राह्मणवाडेच्या सरपंचपदी गिते
By admin | Published: October 21, 2016 01:10 AM2016-10-21T01:10:16+5:302016-10-21T01:19:55+5:30
ब्राह्मणवाडेच्या सरपंचपदी गिते
नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रभागाबाई दत्तोपंत गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सुनंदा तबाजी वाघ यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपद रिक्त होते. सरपंचपद भरण्यासाठी मंडल तथा निवडणूक निर्णय अधिकारी माणिक गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस उपसरपंच सुनील गीते, ग्रामपंचायत सदस्य भीमा गिते, संजय गिते, सुनील रामराजे, शीतल रामराजे, मंदा माळी, मंगल घुगे, सुनंदा वाघ, चंद्रभागाबाई गिते आदि उपस्थित होते. यावेळी सरपंचपदासाठी गिते यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून मंगला दिलीप घुगे तर अनुमोदक म्हणून सुनील अर्जुन गिते यांची स्वाक्षरी होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत गिते यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गाडे यांनी केली. निवड जाहीर होताच गिते समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच चंद्रभागाबाई गिते यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर भगवानबाबा मंदिरात झालेल्या सभेत उपसरपंच सुनील गिते यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी आजपर्यंत दिल्याप्रमाणे यापुढेही पाठींबा दिल्यास मोठ्या प्रमाणात विकासकामे राबविणे सहज शक्य होणार असल्याचे सांगितले. यावेळी धनराज रामराजे, पी. डी. गिते, डी. बी. गामणे, दिलीप घुगे, परसराम रामराजे, नवनाथ गामणे, योगेश धात्रक, दिलीप गिते, बजरंग गिते, नामदेव गिते, विलास गिते,
रवी गिते, बापू गिते, किरण गिते,
छबु गिते, गोपीनाथ अमृते, दत्ता अमृते, विष्णूपंत कटाळे, दत्तोपंत
गिते आदिंसह ग्रामस्थ उपस्थित
होते. देवराम गिते यांनी प्रास्ताविक केले. साहेबराव घुगे यांनी आभार मानले. (वार्ताहर)