पेटू लागल्या शेकोट्या

By admin | Published: December 27, 2015 10:23 PM2015-12-27T22:23:22+5:302015-12-27T22:26:25+5:30

कडाका कायम : थंडीच्या बचावासाठी प्रयत्न

Gourmet pheletas | पेटू लागल्या शेकोट्या

पेटू लागल्या शेकोट्या

Next

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीची लाट पसरलीआहे. या थंडीचा परिणाम चांगलाच जाणवत असल्यामुळे पंचवटी परिसरात दिवसाही शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळी सात वाजेनंतर परिसरातील रस्ते निर्मनुष्य होऊन शुकशुकाट पसरत आहे.
वाढत्या थंडीमुळे नागरिक दिवसा व सायंकाळच्या सुमाराला कामानिमित्ताने घराबाहेर पडताना अंगात स्वेटर्स, डोक्यात कानटोपी, हातमोजे तर कोणी गळ्यात मफलर टाकूनच बाहेर पडत असल्याचे बघायला मिळते. एरवी सायंकाळच्या सुमाराला परिसरातील मंदिर तसेच चौकाचौकात थांबणारी तरुण मंडळी आता झाडाखाली सायंकाळच्या वेळी झाडाचा पालापाचोळा तसेच वृत्तपत्रांची रद्दी पेटवून तर कोणी झाडांची वाळलेली लाकडे पेटवून शेकोटी करून त्याभोवती फेर धरून बसलेली असतात. कडाक्याच्या थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरत असल्याने अनेक जण सायंकाळी सात वाजेनंतर घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तपमानात घट झाल्यामुळे पारा चांगलाच घसरला आहे. त्याचा परिणाम दिवसाही पूर्णपणे गारवा जाणवत असल्याने काही नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे पंचवटी परिसरात दिसून येत आहे.
थंडीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही जाणवला असून ऐरवी वाहनांच्या वर्दळीने फुलणारे रस्ते थंडीमुळे काहीसे ओस पडले आहेत, तर सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांच्या गर्दीने भरगच्च होणाऱ्या मैदानावरची गर्दी काहीशी ओसरली आहे. (वार्ताहर)

Web Title: Gourmet pheletas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.