गोवर-रूबेला लसीकरण; गैरसमज दूर करा : सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:24 AM2019-01-01T02:24:46+5:302019-01-01T02:25:28+5:30
शहरात गोवर-रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पोलीओला ज्याप्रमाणे हद्दपार केले त्याचप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस धर्मगुरू व मौलाना-मौलवींनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
मालेगाव : शहरात गोवर-रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पोलीओला ज्याप्रमाणे हद्दपार केले त्याचप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस धर्मगुरू व मौलाना-मौलवींनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
शहरातील सुलेमान चौकातील जमेतुल उलेमा संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. पोलीओप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरणाबाबत शहरात गैरसमज निर्माण झाला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी आलो असल्याचे सावंत यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत जनजागृती करीत आहेत. यापुढेही अधिकारी नागरिकांचा गैरसमज दूर करतील. पोलीओ प्रमाणे गोवर-रुबेला लसीकरणासही शहर वासियांनी सहकार्य करावे, शहरातील आरोग्य सेवा व्यवस्थीत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. सामान्य रुग्णालयातील रिक्तपदे भरली जाणार आहेत. शहरातील
खाजगी डॉक्टरांनी रुग्णसेवा पुरवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी
केली.
यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक शशिकांत जाधव, डॉ. प्रकाश पाडवी, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी वैशाली झनकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, अजहर शेख, डॉ. अब्बास, डॉ. भीमराव त्रिभुवन, डॉ. प्रशांत वाघ, जमेतुल उलेमाचे साकीर, मौलाना जमाली, मौलाना कारी, शहरातील मौलाना-मौलवी, धर्मगुरु उपस्थित होते.