आरोग्य विभागातर्फे गोवर-रुबेला लसीकरण प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:40 AM2018-11-20T00:40:05+5:302018-11-20T00:40:31+5:30
: गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तालुकास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांच्या हस्ते झाले.
गंगापूर : गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तालुकास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांच्या हस्ते झाले. गोवर हा प्राणघातक रोग आहे आणि बालकांमधील विविध गुंतागुंत व मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे आणि त्याचा प्रसार संसर्ग झालेल्या व्यक्तीचे खोकणे, शिंकणे याद्वारे होतो. बालकाचे लसीकरण करण्यात यावे रुबेला तसेच गोवर्षी संबंधित न्यूमोनिया, अतिसार, मेंदूज्वर यांसारख्या प्राणघातक परिणामांपासून बालकांचे रक्षण व्हावे यासाठी लसीकरण हा एकमेव संरक्षक उपाय असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. भोये यांनी यावेळी दिली. मोहीम राबविण्यासाठी शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, नगर परिषद आरोग्य विभाग या सर्वांचे सहकार्य घेतले जाणार आहे. मोहीम राबविताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात कशी करता येईल याविषयी संचालन डॉ.परशुराम किरवले, डॉ. हेमलता शितोळे यांनी केले. कार्यशाळेला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आदी उपस्थित होते. मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि अनुषंगिक सर्व बाबींचे नियोजन करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. भोये यांनी यावेळी दिल्या. लसीकरण मोहिमेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जायभावे व डॉ. भालेराव यांनी गोवर व रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत शासनाच्या सूचनांची माहिती दिली.