शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध दानवे : मालेगावी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:24 AM2018-05-11T00:24:54+5:302018-05-11T00:24:54+5:30

मालेगाव : शेतकºयांच्या हितासाठी तिजोरी रिकामी झाली तरी चालेल मात्र शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील. शेतकºयांना रस्ते, वीज, कर्जमाफी, व्याजमाफी, पीकविमा, खतांची कृत्रिम टंचाई दूर करण्यास भाजपा शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.

Governance committed for the welfare of farmers: Meetings of BJP workers of Malegaon | शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध दानवे : मालेगावी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध दानवे : मालेगावी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

Next
ठळक मुद्देकेंद्रात चार व राज्यात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे

मालेगाव : शेतकºयांच्या हितासाठी तिजोरी रिकामी झाली तरी चालेल मात्र शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील. शेतकºयांना रस्ते, वीज, कर्जमाफी, व्याजमाफी, पीकविमा, खतांची कृत्रिम टंचाई दूर करण्यास भाजपा शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. येथील सटाणा नाका भागात मालेगाव महानगर व तालुका भाजपाने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी खासदार दानवे बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, आमदार सीमा हिरे, महानगरप्रमुख सुनील गायकवाड, जिल्हा बॅँकेचे चेअरमन केदा आहेर, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाप्रमुख दीपक पवार, संदीप पाटील, नगरसेवक मदन गायकवाड, जि.प. सदस्य समाधान हिरे, मनीषा हिरे, सुरेश निकम आदींसह भाजपा नगरसेवक उपस्थित होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे पुढे म्हणाले की, भाजपाच्या सरकारला केंद्रात चार व राज्यात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. शासनाने काय केले याचा अभ्यास कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. विरोधी पक्षाचे नेते एकेकाळी भाजपाची टिंगलटवाळी करायचे; मात्र कार्यकर्त्यांच्या कष्टाला यश आले आहे. सत्ता आल्यानंतर भाजपाने सर्वसामान्य नागरिकांच्या व शेतकरी हिताचे निर्णय घेतले. पीक आणेवारी काढण्याची ब्रिटिशकालीन पद्धत बंद केली. शेतकºयांना पीक विमा मिळवून दिला जात आहे. शेतकºयांसाठी वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने उपलब्ध करुन दिली जात आहेत. त्यामुळे शेतकºयांचा माल बाजारपेठेत वेळेवर पोहचतो. शेतकºयांना रांगेत उभे राहून युरीया घ्यावा लागायचा. कृत्रीम टंचाई करुन शेतकºयांना लुटले जायचे आता शासनाने शेतकºयांना मुबलक युरीया उपलब्ध करुन पाच वर्ष स्थिर भाव ठेवला आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. ३४ हजार २३४ कोटींची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. कर्जावरील व्याजही शासन भरणार आहे. विजेचा तुटवडा दूर करण्यात आला आहे. नवीन उपकेंद्रे उभे करुन सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे.
विधान परिषदेसाठी युतीधर्म पाळावा
राज्यात विधान परिषदेच्या सहा जागा आहेत. तीन भाजपा व तीन सेना असा फार्म्यूला ठरलेला आहे. शिवसेनेने आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्ही शिवसेनेला देऊ, पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने युतीधर्म पाळला पाहिजे, असे मत दानवे यांनी मेळावा संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनावर बोलताना दानवे म्हणाले की, भुजबळांना केवळ जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप मिटले नाहीत. नाशिक विधान परिषद निवडणुकीत पक्षाचा उमेदवाराच निवडून आणला जाईल. छुपा पाठिंबा दिला जाणार नाही. माजी मंत्री प्रशांत हिरे, अद्वय हिरे, आमदार अपूर्व हिरे राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत, असे विचारले असता भारतीय जनता पक्ष त्यांच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

Web Title: Governance committed for the welfare of farmers: Meetings of BJP workers of Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.