नाईक शिक्षण संस्थेत सत्तापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:05 AM2019-07-22T02:05:59+5:302019-07-22T02:06:48+5:30
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाच्या क्रांतिवीर पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का दिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह तालुका संचालकपदांच्या १९ पैकी १९ जागांवर क्रांतिवीर पॅनलने विजय मिळविला आहे. मात्र सरचिटणीस व सहचिटणीस ही दोन महत्वाची पदे प्रगती पॅनलला मिळाली आहेत.
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाच्या क्रांतिवीर पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का दिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह तालुका संचालकपदांच्या १९ पैकी १९ जागांवर क्रांतिवीर पॅनलने विजय मिळविला आहे. मात्र सरचिटणीस व सहचिटणीस ही दोन महत्वाची पदे प्रगती पॅनलला मिळाली आहेत. सरचिटणीसपदासाठी हेमंत धात्रक व अभिजित दिघोळे या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने टेंडर मते मोजण्यात आली. यामध्ये हेमंत धात्रक हे विजयी झाले. तसेच सहचिटणीसपदाची जागाही जिंकण्यात सत्ताधारी प्रगती पॅनलला यश आले आहे.
नाशिकशिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत क्रांतिवीर पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार पंढरीनाथ
थोरे यांनी विजयी आघाडी घेतली असून, त्यांनी संस्थेत गेल्या २५ वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत असलेल्या कोंडाजी आव्हाड यांच्यापेक्षा मताधिक्य घेतल्याने हा सत्ताधारी पॅनलला मोठा धक्का मानला जात आहे. तर उपाध्यक्षपदासाठी अॅड. पी. आर. गिते यांनी प्रभाकर धात्रक यांच्या विरोधात विजय आघाडी घेतली असून,
प्रगती पॅनलचे सहचिटणीसपदाचे उमेदवार क्रांतिवीर संस्था निवडणुकीला रविवारी (दि.२१) सकाळी ८ वाजेदरम्यान गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीला मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येऊन गठ्ठे तयार करण्यात आले. शनिवारी ७९ टक्के मतदान झाले होते. मतदानास सभासदांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना धक्का देणारी वा चुरशीची ठरेल, असा कयास बांधला जात होता. रविवारी झालेल्या मतमोजणीमुळे या अंदाजाला पुष्टी मिळाली. मतदारांनी यंदा सत्ताधारी गटाला हुलकावणी देत जबर धक्का दिला आहे. दोन्हीही पॅनल्सच्या समर्थकांनी सकाळपासून लॉन्सबाहेर गर्दी केली होती. ही गर्दी सायंकाळी वाढतच गेली.
समर्थकांनी केला एकच जल्लोष
सरचिटणीस पदासाठी हेमंत धात्रक व अभिजित दिघोळे यांना समान मते मिळाल्याने टेंडर मतांची मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीमध्ये तीन टेंडर मते टाकण्यात आली होती.यापैकी दोन मते हेमंत धात्रक यांच्या पारड्यात पडली तर एक मत दिघोळे यांना मिळाल्याने हेमंत धात्रक यांना विजयी घोषित करण्यात आले. हेमंत धात्रक यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.