शासनाचा प्रशासनावर अंकु श नाही : हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:10 AM2018-03-29T01:10:48+5:302018-03-29T01:11:20+5:30

पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

Government administration does not have any points: Harshvardhan Patil | शासनाचा प्रशासनावर अंकु श नाही : हर्षवर्धन पाटील

शासनाचा प्रशासनावर अंकु श नाही : हर्षवर्धन पाटील

googlenewsNext

नाशिक : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व श्री जैन सेवा कार्य समिती यांच्यातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि. २८) उद्घाटन झाले. व्यासपीठावर माजी आमदार जयप्रकाश छाजेड, नगरसेवक हेमलता पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, शांतीलाल दुग्गड, मोहनलाल लोढा, डॉ. विक्रम शाह आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्याची राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्रात राजकीय चित्र फारसे आशादायी नाही. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधाºयांनी विरोधकांचा सन्मान करून देशातील लोकशाही सुदृढ केली. त्यामुळे जगभरात भारतीय लोकशाही सर्वात प्रबळ आहे. परंतु सध्याच्या सत्ताधाºयांनी संसदीय प्रोटोकॉल बुकचे कधी वाचनच केले नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे सरकारचा प्रशासनावर वचक उरलेला नाही. विरोधी पक्षांना विश्वासात न घेता निर्णय घेत सत्ताधाºयांकडून त्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे.  हा राजकीय द्वेष पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे. कदाचित सत्तेचे हे चक्र फिरते असल्याचा सध्याच्या सत्ताधाºयांना विसर पडला असल्याचा टोलाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला लगावला. दरम्यान, डॉ. विक्रम शाह यांच्या ‘जिनश्वर पूजा’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गौतम सुराणा यांनी केले.
काम ठप्प पडल्याने वाढले उंदीर
मंत्रालयाची अवस्था अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या घरासारखी झाली आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण उरले नसल्याने मंत्रालयात कोणतेही काम होत नसून अनेक दिवस फाईली पडून राहिल्यानेच मंत्रालयात उंदीर वाढल्याची बोचरी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर केली.
ाजेड यांची खोचक टीका
माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता व्याख्यानमालेचा विषय ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा’ असा ठेवण्याऐवजी ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा’ असा ठेवला असता तर तो अधिक संयुक्तिक ठरला असता, अशी खोचक टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

Web Title: Government administration does not have any points: Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक