येवला उपजिल्हा रु ग्णालयाच्या बांधकामास शासनाची मंजुरी
By admin | Published: October 25, 2016 11:20 PM2016-10-25T23:20:58+5:302016-10-25T23:21:37+5:30
सुविधा : साडेआठ कोटी रु पये खर्चास प्रशासकीय मान्यता
येवला : येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी साडेआठ कोटी रुपयांच्या बांधकामास
शासनाने सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली.
शहर व तालुक्याचा विस्तार बघता नागरिकांना येवला येथे चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत उपलब्ध करून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व वैद्यकीय सेवा येवला येथे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी येवला ग्रामीण ्नरुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी पाठपुरावा केला.
येवला शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर याठिकाणी एकूण ६० नवीन पदे निर्माण होणार आहेत. त्यात प्रत्येकी एक सर्जन वैद्यकीय अधिकारी, स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, दंत चिकित्सक, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ, चार वैद्यकीय अधिकारी अपघात, एक मेट्रन, तीन पीएचएन, याबरोबरच २० अधिपरिचारिका यांच्यासह एक आहार तज्ज्ञ, दोन रक्तपेढी तज्ज्ञ, दोन प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्ष-किरण विभागतज्ज्ञ, एक इसीजी तंत्रज्ञ इ. विविध ६० नवीन पदांचा समावेश आहे. मागील मोकळ्या भूखंडामध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी धर्मशाळा, उपाहारगृह तर रुग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट इत्यादींचा समावेश असेल. (वार्ताहर)