मंत्रालयाशी शासकीय पत्रव्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:17 PM2020-06-11T19:17:10+5:302020-06-11T19:18:37+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याचा शासकीय कामकाजावर झालेला विपरित परिणाम तीन महिन्यांनंतरही जाणवू लागला असून, या काळात शासनाकडून विविध आदेश, सूचना काढण्यात आल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी करताना येणाºया अडी अडचणी, शासनाचे मार्गदर्शन, विकासकामांचे प्रस्ताव व शासनाकडून लागणारी मंजुरी याबाबतचा पत्रव्यवहार त्या त्या शासकीय कार्यालयांमध्येच गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहे. प्रत्येक विभागाच्या टपाल विभागात मंत्रालयात पाठवायच्या टपालाचे गठ्ठे लागल्याचे चित्र दिसू लागले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती. शासनाच्या या अचानक लागू केलेल्या निर्णयाने विविध खात्यांमध्ये निर्णय प्रक्रियेत असलेल्या कामांना स्थगिती तर मिळालीच परंत त्याबरोबरची कायदोपत्री प्रक्रियाही थंडावली होती. मात्र लॉकडाऊनच्या अगोदर शाासकीय पातळीवरील अनेक निर्णयांसाठी मंत्रालयातील विविध खात्यांकडून मार्गदर्शन मागविण्यासाठी कार्यालयांंनी पत्रव्यवहारही केलेला होता. परंतु मंत्रालयातच मोजके कामकाज या काळात होवू शकल्यामुळे सर्वच खात्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स, निर्णयप्रक्रियेत असलेले विकासकामांबाबत कोणताही निर्णय होवू शकलेला नाही. मंत्रालयात ही परिस्थिती असताना विभागीय कार्यालये, जिल्हास्तरीय कार्यालये व तालुकास्थित कार्यालयांमध्येदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. गेल्या तीन महिन्यांपासून शासन दरबारी करावयाच्या पत्रव्यवहाराचे गठ्ठे टपाल खात्यात पडून आहेत. एरव्ही दररोज मंत्रालयात शासकीय पातळीवर करण्यात येणाºया पत्रव्यवहारासाठी दररोज त्या त्या कार्यालयाचा एक व्यक्ती सायंकाळी सर्व महत्त्वाचे टपाल गोळा करून दुसºया दिवशी सकाळी मिळेल त्या वाहनाने मुंबईला रवाना होवून मंत्रालयात वा त्या त्या विभागाच्या मुख्यालयात जाऊन टपालाचे वाटप करून पुन्हा परत येत अशावेळी मुख्यालयात वा मंत्रालयात आपल्या विभागासाठी असलेले टपालदेखील तो घेऊन येत असल्याची पद्धत अवलंबली जात होती. परंतु तीन महिन्यांपासून टपाल जरी स्थानिक पातळीवर जमा होत असले तरी रेल्वे, एसटी खासगी वाहनांना कोरोनामुळे प्रतिबंध घालण्यात आला असल्याने वाहतुकीच्या साधनाअभावी टपाल जैसे थे पडून आहे. या टपालात अनेक महत्त्वाचे निर्णय, शासनाचे मार्गदर्शन, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, शासनाला पाठवायची महत्त्वाची माहिती टपालबंद झाली आहे.