शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:46 AM2018-05-11T01:46:23+5:302018-05-11T01:46:23+5:30

नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. या प्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

Government cuts: Forest department takes charge of Gazalakshmi's treatment | शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल

शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल

Next
ठळक मुद्दे‘विव्हळणाºया गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’लक्ष्मीवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश

नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. या प्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीचा सांभाळ करणाºया संबंधिताने तिची योग्य देखभाल न घेतल्यास त्याचा परवाना रद्द करण्याच्या दृष्टीने योग्य त्या कार्यवाहीच्या सूचनाही वनखात्याला दिल्या आहेत.
‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणाºया गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीचा वृत्तांत मांडला होता. त्याचबरोबर वनविभागाच्या अनास्थेकडेही लक्ष वेधले होते. या वृत्तानंतर प्राणिमित्रांकडून लक्ष्मीच्या सुटकेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारची चळवळच उभी केली होती. दरम्यान, ‘लोकमत’च्या या वृत्तानंतर वनमंत्रालयानेच या प्रकरणाची दखल घेत लक्ष्मीवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले की, लक्ष्मीवर तातडीने योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीने पुढील काळात तिची योग्य ती देखभाल न केल्यास त्याचा परवाना रद्द करण्याबाबतही सरकारी पातळीवर विचार केला जाणार आहे. उपचारासाठी लागणारा निधी सरकारी स्तरावर कमी पडल्यास विशेष कल्याणकारी निधीतून लक्ष्मीवर उपचार केले जातील. नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी वनमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने एक समिती गठित केली असून, त्यामध्ये वनविभागाच्या काही अधिकाºयांसह डॉक्टरांचाही समावेश केला आहे. तसेच मुंबई भायखळा येथील प्राणिसंग्रहालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून लक्ष्मीवरील उपचाराबाबतची प्रक्रिया सुरू केली.
...तर परवाना होणार रद्द
संबंधित व्यक्तीकडे लक्ष्मीचा परवाना असल्याने तिला ताब्यात घेण्यावरून वनविभाग संभ्रमात आहे. मात्र पुढील काळात तिची योग्य देखभाल न केल्यास संबंधित व्यक्तीचा परवाना रद्द करून लक्ष्मीला ताब्यात घेतले जाणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी स्पष्ट केले. त्याबाबतच्या वनविभागाला त्यांनी सूचनाही दिल्या आहेत.

Web Title: Government cuts: Forest department takes charge of Gazalakshmi's treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल