जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:43 AM2019-07-04T00:43:21+5:302019-07-04T00:43:50+5:30
नाशिक : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियन, सिन्नर येथील महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, निफाड येथे मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली.
नाशिक : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियन, सिन्नर येथील महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, निफाड येथे मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली.
घोटी : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास २० आॅगस्टला राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचे यावेळी निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
लक्षवेधी आंदोलनात विविध कर्मचारी, अधिकारी संघटना सहभागी झाल्या. गटविकास अधिकारी किरण जाधव, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंडे यांना मागण्यांबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. सातव्या वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी, प्रलंबित महागाई भत्ते सत्वर द्यावेत, मुदतपूर्व सक्तीने सेवानिवृत्ती थांबवावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्तपदे आणि अनुकंपाधोरण पारदर्शक करावे, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.
शासनाच्या उदासीन कारभारामुळे लक्षवेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या आदेशान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शने केली. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व त्यास संलग्न असलेल्या जिल्हा ग्रामसेवक युनियन, नर्सेस संघटना, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, वाहनचालक संघटना, परिचर संघटना, मैल कामगार संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार २० आॅगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला जाणार आहे.
सिन्नर : राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी लक्षवेध दिनानिमित्त गटविकास अधिकाºयांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने पंचायत समितीच्या प्रवेशद्वारात दुपारी भोजनाच्या सुट्टीत निदर्शने करण्यात आली. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद निरगुडे, विस्तार अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद बिब्बे, सदाशिव बारगळ, ग्रामसेवक संघटनेचे सचिव जालिंदर वाडगे यांनी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी विष्णू सहाणे, एस. एन. पांगारकर, रामलाल कोळमुते, आर. पी. सोनवणे, नितीन भडकवाडे, पांडुरंग सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.या आहेत मागण्या...राज्य सरकारी कर्मचाºयांना केंद्राप्रमाणे वेतन, भत्ते द्या, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या तत्काळ करणे, सरकारी सेवांचे खासगीकरण बंद करणे, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, महिला कर्मचाºयांना दोन वर्षे संगोपन रजा मंजूर करणे.