कामगार कायद्याच्या विरोधात आज सरकारी कमर्चा-यांची आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:15 IST2020-09-28T22:32:10+5:302020-09-29T01:15:45+5:30
नाशिक - केंद्र शासनाने कामगार विरोधातील तीन विधेयके नुकतीच मंजुर केली आहेत. त्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी कमर्चारी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ...

कामगार कायद्याच्या विरोधात आज सरकारी कमर्चा-यांची आंदोलने
नाशिक - केंद्र शासनाने कामगार विरोधातील तीन विधेयके नुकतीच मंजुर केली आहेत. त्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी कमर्चारी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. २९) जिल्ह्यातील प्रत्येक शासकिय कार्यालयासमोर दुपारी दोन ते तीन या वेळात आंदोलने करण्यात येणार आहे.
केंद्र शासन आंतरराष्टÑीय नाणेनिधीच्या दबावाखाली कामगार विरोधी कायदे करीत आहेत. त्यामुळे स्थायी कामगारांना अस्थायी करण्याचा घाट घातला जात आहे. शासकिय सेवेतील लाखो पदे रिक्त असून ती भरण्याऐवजी शासकिय सेवांचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण करण्यात येत आहे. कामगार आणि कमर्चाऱ्यांच्या विरोधातील या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी ही आंदोलने राज्य पातळीवर होणार आहेत. नाशिक मध्ये कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन नियमांचे पालन करून दुपारी दोन वाजता सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येणार आहेत.
या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दिलीप थेटे, उत्तमबाबा गांगुर्डे, सुनंदा जरांडे यांनी केले आहे.