नौकानयन खेळाडूंना शासनाकडून अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:36 IST2021-01-28T20:35:12+5:302021-01-29T00:36:54+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील नौकानयनच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाने दखल घेत प्रत्येकी एक लाखांची मदत केली आहे.

राज्य शासनाने अर्थसाहाय्य केलेले खेळाडू सुलतान देशमुख, सागर नागरे, रवींद्र कडाळे व सनी सोनवणे.
पिंपळगाव बसवंत : येथील नौकानयनच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाने दखल घेत प्रत्येकी एक लाखांची मदत केली आहे.
नौकानयन स्पर्धेत २०१८ साली हंगेरी युरोप येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून आठ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यात पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे सुलतान देशमुख, सागर नागरे, रवींद्र कडाळे व सनी सोनवणे हे खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंना राज्य शासनाने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील २० खेळाडू नौकानयनचा सराव पिंपळगाव बसवंत, नाशिक, सायखेडा, विल्होळी आदी ठिकाणी करत असून त्यात १० मुलींचा समावेश आहे. या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
फोटो- २८ पिंपळगाव नौकानयन