स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सरकारी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:06 AM2018-05-28T00:06:51+5:302018-05-28T00:06:51+5:30
भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवार, दि. २८ रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.
नाशिक : भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवार, दि. २८ रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, अशाप्रकारे पहिल्यांदाच शासनाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भात सावरकर प्रेमींकडून राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचीच शासनाने दखल घेऊन आता यापुढे सर्वच राष्टÑपुरुषांप्रमाणे सावकर यांनाही जयंती दिनी अभिवादन करण्यात येणार आहे. सावरकर यांचे अस्सल छायाचित्र उपलब्ध करण्याबाबत राज्य सरकारकडून अनेक ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. अखेर जिल्हा प्रशासनाने सावरकर यांच्या मूळ जन्मगाव असलेल्या भगूर येथे त्यांच्या वाड्यात लावलेले छायाचित्र पसंत करण्यात आले. या छायाचित्रावर सावरकर यांच्या कुटुंबीयांच्या सत्यप्रत असल्याबद्दल स्वाक्षऱ्या आहेत. हेच छायाचित्र शासनाला पाठविण्यात आले आहे.
छायाचित्र उपलब्ध
विशेष म्हणजे राज्य सरकारकडून सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे छायाचित्र नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने सामान्य प्रशासन विभागाला उपलब्ध करून दिले असून, तेच छायाचित्र आता सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये जयंतीदिनी वापरण्यात येणार आहे.