अवैध गर्भपात प्रकरणी शासकीय रुग्णालयांची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:08 PM2020-09-28T23:08:27+5:302020-09-29T01:22:20+5:30
नाशिक: नाशिकमधील जिल्हा शासकीय रूग्णालयात अवैध गर्भपात करण्याचा प्रकार सन २०१७ रोजी माध्यमांनी समोर आणल्यानंतर याप्रकरणी त्यावेळी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. नाशिक जिल्'ापुरतीच सदर समिती मर्यादीत असल्याने आता राज्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयांमधील अशाप्रकारच्या प्रकरणांची देखील चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

नाशिाक जिल्हा रूग्णालयात अवैध गर्भपात करण्यात आल्याचा प्रकार २ एप्रिल २०१७ रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्र्यांनी याप्रकरणी विधानमंडळात निवेदनही केले होते. शासकीय रूग्णालयांमध्ये घडणाऱ्या बेकायदेशीर गर्भपाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय गर्भपात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.
त्यानुसार समिती देखील स्थापन करण्यात आली होती. परंतु ही समिती केवळ नाशिक जिल्'ापुरतीच मर्यादीत असल्यामुळे राज्यातील अन्य शासकीय रूग्णालयांमधील अशाप्रकारच्या प्रकरणांची चौकशी देखील होणे अपेक्षित असल्याने समितीची कक्षा रूंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात इतरत्र घडणाºया अवैध गर्भपात प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलीस सेवेतील आयपीएस दर्जाच्या सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
गर्भपात प्रकरणाच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समिती आता राज्यातील शासकीय जिल्हा रूग्णालयांची देखील चौकशी करणार आहे. सेवानिवृत पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यंक्षतेखील स्थापन झालेल्या या समितीमध्ये त्यांच्यासह एकुण चार सदस्य आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवेतील सेवानिवृत्त संचालक, स्थीरोगतज्ज्ञ, कुटूंब कल्याण योजेनेतील सहाय्यक संचालक यांचा समावेश आहे.