बळीराजाबद्दल सरकार असंवेदनशील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर ;हेक्टरी १ लाख रुपये भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:54+5:302021-03-28T04:14:54+5:30

बागलाण तालुक्यात सलग पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमात घातले होते . या अस्मानी संकटात ६७ गावे आणि ...

Government insensitive about Baliraja Leader of Opposition Praveen Darekar; Demand for Rs 1 lakh per hectare | बळीराजाबद्दल सरकार असंवेदनशील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर ;हेक्टरी १ लाख रुपये भरपाईची मागणी

बळीराजाबद्दल सरकार असंवेदनशील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर ;हेक्टरी १ लाख रुपये भरपाईची मागणी

Next

बागलाण तालुक्यात सलग पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमात घातले होते . या अस्मानी संकटात ६७ गावे आणि १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणी दौरावर शनिवारी दरेकर बागलाणमध्ये होते. पठावे दिगर ,मोरकुरे, दिगर ,केरसाणे ,मुल्हेर ,अंतापूर या भागातील हानी झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली. दरेकर यांच्या समवेत आमदार दिलीप बोरसे ,आमदार डॉ. राहुल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार आहेर ,सुरेश निकम ,देवा पाटील ,आबासाहेब बच्छाव .केदाबापू काकुळते ,संजय देवरे ,पंकज ठाकरे ,दिलीप अहिरे ,सुरेश मोरे , तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे ,कृषि अधिकारी अशोक पवार ,प्रणय हीरे आदि सहभागी होते . त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला केला . हे तीन चाकांचे सरकार स्वतःला सांभाळण्याच्या नादात जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. बागलाण मधील शेतकरी सलगच्या आस्मानी संकटाला तोंड देत असतांना सरकारकडून दमडीची मदत तर मिळालीच नाही. उलट वीज बिलांच्या वसुलीसाठी ट्रान्सफार्मर बंद केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

हेक्टरी १ लाखांची मागणी करणार

बागलाण तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाने हानी झालेल्या पिकांना हेक्टरी १ लाख रुपयांची मागणी सरकारकडे लावून धरणार असल्याचे दरेकर यांनी संगितले. कांद्याचे बियाणे पूर्णपणे नष्ट झाले असून आगामी हंगामात शासनाने शेतकऱ्यांना कांदा बियाणे उपलब्ध करून द्यावे ,वीज बिल आणि कर्ज वसुलीस तत्काल स्थगिती द्यावी नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे ,तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली.

फोटो कप्शन ; बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करतांना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर समवेत आमदार दिलीप बोरसे ,आमदार राहुल आहेर ,केदा आहेर ,सुरेश निकम आदि .दुसऱ्या छायाचित्रात तळवाडे दिगर येथील गारपीटने हानी झालेले कांदा पीक पाहतांना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ,आमदार दिलीप बोरसे ,आमदार राहुल आहेर आदि .

Web Title: Government insensitive about Baliraja Leader of Opposition Praveen Darekar; Demand for Rs 1 lakh per hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.