ज्ञानेश्वर जुंद्रे यांना शासनाचा कामगार भूषण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 07:17 PM2021-02-17T19:17:46+5:302021-02-17T19:24:40+5:30

नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर जुंद्रे यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार कल्याण व कामगार भूषण पुरस्कार नुकताच मुंबईत एका समारंभात प्रदान करण्यात आला.

Government Kamgar Bhushan Award to Dnyaneshwar Jundre | ज्ञानेश्वर जुंद्रे यांना शासनाचा कामगार भूषण पुरस्कार

प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, प्रधान सचिव सिंघल आदी मान्यवर उपस्थित

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर जुंद्रे यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार कल्याण व कामगार भूषण पुरस्कार नुकताच मुंबईत एका समारंभात प्रदान करण्यात आला.

ज्ञानेश्वर जुंद्रे यांची महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, प्रधान सचिव सिंघल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर जुंद्रे व मजदूर संघाचे सभासद रोहित कानडे यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने जुंद्रे व कानडे यांचा गुणवंत मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राजेश टाकेकर, शिवाजी कदम, नंदू पाळदे, कार्तिक डांगे, उत्तम रकिबे, जयराम कोठुळे, रमेश खुळे, इरफान शेख, अनिल थोरात, राजू जगताप, प्रवीण बनसोडे, चंद्रकांत हिंगमिरे, भिमा नवाळे, नंदू कदम, अण्णा सोनवणे, विनोद लोखंडे, व्ही. एम. जगताप आदी उपस्थित होते. 

Web Title: Government Kamgar Bhushan Award to Dnyaneshwar Jundre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.