पर्यटनपुरक व्यवसायाला मिळणार शासकिय कर्ज; पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 08:16 PM2017-09-27T20:16:50+5:302017-09-27T20:22:18+5:30

सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.

Government loans to tourism business; Moving Tourism | पर्यटनपुरक व्यवसायाला मिळणार शासकिय कर्ज; पर्यटनाला चालना

पर्यटनपुरक व्यवसायाला मिळणार शासकिय कर्ज; पर्यटनाला चालना

Next
ठळक मुद्दे ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतेराज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधामहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध

नाशिक : सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ नाशिक व ईजी सोल्युशन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन : विकास व संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२७) मखमलाबाद रस्त्यावरील ग्रीन लॅन्ड रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे म्हणून व्यासपीठावर पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, महाराष्टÑ कौशल्य व उद्योजकता विकास संचलनालयाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सारंगखेड्याचे सरपंच जयपाल रावल उपस्थित होते. यावेळी काचे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधा उपलब्ध आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांना ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. याकरिता प्रकल्प अहवाल, व्यावसायिकता, प्रामाणिकपणा, जिद्द-चिकाटी आदिंची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंडावरे यांनी राज्य पर्यटन महामंडळाकडून राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ‘तान’चे दत्ता भालेराव यांनी ‘नाशिक : कृषी पर्यटनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना पर्यटन अभ्यासक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, पर्यटनाचे धडे देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणाईला योग्य दिशा दाखविल्यास बेरोजगारीला आळा बसेल, असे अकादमीचे प्रशिक्षक सागर धर्माधिकारी यांनी सांगितले. जयेश तळेगावकर यांनी वाइन पर्यटन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विविध राज्यांमधील पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Web Title: Government loans to tourism business; Moving Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.