त्र्यंबकला पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:36 AM2018-01-08T00:36:57+5:302018-01-08T00:39:31+5:30
त्र्यंबकेश्वर : संतशिरोमणी निवृत्तिनाथ महाराज यात्रेत संजीवन समाधीची शासकीय महापूजा पौष वद्य एकादशी या दिवशी राज्याचे जलसंपदा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, तर पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावर्षापासून दरवर्षी निर्मलवारी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व मुख्याधिकारी डॉ.चेतना केरुरे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर : संतशिरोमणी निवृत्तिनाथ महाराज यात्रेत संजीवन समाधीची शासकीय महापूजा पौष वद्य एकादशी या दिवशी राज्याचे जलसंपदा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, तर पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावर्षापासून दरवर्षी निर्मलवारी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्र्यंबकचे नगराध्यक्ष
पुरुषोत्तम लोहगावकर व मुख्याधिकारी डॉ.चेतना केरुरे यांनी दिली.
वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा ११ ते १३ जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवारी आहे.
यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी व यात्रेकरू वारकरी बांधवांना पालिकेने मूलभूत नागरी सुविधा देण्यासाठी यात्रा नियोजनाचा भाग म्हणून या सुविधा योजनांचा डीपीआर पालिकेने तयार केला आहे. या डीपीआरला जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन व पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मंजुरी दिली आहे. प्राप्त यात्राकर अनुदान रु .६१.०३ लक्ष कामास जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे. यातुन यात्रेकरु ंसाठी मुलभुत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. याशिवाय वनवासी आश्रम संस्थेचे ३००० स्वयंसेवक यावेळी उपस्थित राहणार आहेत. यात्रा नियोजनात स्वच्छता वाहतुकीचे नियोजन दर्शन रांगा जीवरक्षक पथक आदींचे वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांचा सक्रिय सहभाग मिळणार आहे.