शासकीय कार्यालये, संस्थामध्ये उरले लॅडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:22 PM2018-10-22T17:22:53+5:302018-10-22T17:23:06+5:30

कळवण : एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईन (दूरध्वनी) यंत्रणा मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालये, संस्था पुरताच मर्यादित राहिला आहे.

Government Offices, Remaining Landline in Institution | शासकीय कार्यालये, संस्थामध्ये उरले लॅडलाईन

शासकीय कार्यालये, संस्थामध्ये उरले लॅडलाईन

Next
ठळक मुद्देकळवण : दूरसंचार सेवेकडे दुर्लक्ष ; नवीन जोडणीला केबल नाही

कळवण : एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईन (दूरध्वनी) यंत्रणा मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालये, संस्था पुरताच मर्यादित राहिला आहे.
कळवण व देवळा तालुक्यात आजमितीस केवळ हजाराच्या आसपास दूरध्वनी कनेक्शन शिल्लक आहे. नवीन दूरध्वनी जोडण्याची मागणी आहे, परंतु केबल नसल्याने जोडण्या देखील बंद आहेत. संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जात असले तरी या महत्वपूर्ण सेवेकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
अलीकडे प्रत्येकांच्या हाती मोबाईल आल्यामुळे लँडलाईन कालबाह्य होणार का ? अशी भीती वाटते. मात्र आता हा आकडा वाढू लागला आहे. लँडलाईन वापरणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये तसेच ज्या व्यक्ती वा संस्थेला ब्रॉडबँडची गरज आहे, अशा व्यक्तीला व संस्थेला लॅन्डलाईनचा क्र मांक, केबल घेणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयात दूरध्वनीसेवा आढळून येते. घरामधून मात्र दूरध्वनी सेवा जवळपास गायबच झाले असल्याचे चित्र दिसून येते.
बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी ग्रामीण भागात टॉवर उभारून सेवा उपलब्ध करून दिली. दूरध्वनीच्या तुलनेत मोबाईलचा वापर करणे सहज शक्य झाले. मोबाईलमुळे संबंधित व्यक्तीला कधीही संपर्क साधता येत असल्याने मोबाईल सेवा देण्यात अनेक खासगी कंपन्या उतरल्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होऊन अत्यंत कमी दरात मोबाईल सेवा उपलब्ध होत आहे. परिणामी नागरिकांनी दूरध्वनी सेवेकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे दूरध्वनीसेवा होती, त्यांनी सुद्धा आता ही सेवा बंद केली आहे.
केबल नसल्याने जोडण्या बंद -
केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी बीएसएनएल ही कंपनी मात्र आपल्या सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे. कळवण विभागात गेल्या काही महिन्यांपासून केबल वाहिनी नसल्याने ग्राहकांना नवीन दूरध्वनी जोडण्या देणे बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे केवळ केबल नसल्याने बीएसएनएलचा विस्तार करणे कठीण होऊन बसले आहे.
आदीवासी भागात इंटरनेटचा बोजवारा-
आदीवासी बहुल कळवण तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर चालला आहे. एकेकाळी बीएसएनएल लँडलाईन तसेच सिमकार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठी होती. ब्रॉण्डबॅण्ड सेवेत महिन्यात पंधरा दिवस बिघाड होतो. त्यामुळे तालुक्यात लिंकअभावी शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांचे कामकाज बºयाच वेळा ठप्प होते.
बीएसएनएलच्या मोबाईल सेवेची हीच अवस्था आहे. टेलिफोनप्रमाणे या कंपनीचे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळाले आहेत. इंटरनेटचा वापर करता यावा म्हणून ब्रॉडबॅन्ड सेवेसाठी बीएसएनएलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता ती खासगी कंपनीद्वारे तत्काळ सेवेमुळे कमी झाली आहे. 

Web Title: Government Offices, Remaining Landline in Institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.