सरकारी कार्यालय फोडले; बसस्थानकातून बांधकाम साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 06:57 PM2020-07-22T18:57:44+5:302020-07-22T18:58:08+5:30
अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : सिडको भागातील आश्विननगर परिसरात असलेल्या बीएसएनएलच्या स्थापत्य विभागाचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून कागदपत्रांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास कार्यालयातील तीन दरवाजे तोडून तेथील कागदपत्रे विस्कळीत केली. तसेच महत्वाची कागदपत्रे लंपाससुध्दा केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेळा बसस्थानकातून बांधकाम साहित्य लंपास
नाशिक : मेळा बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने बांधकामासाठी लागणारे मौल्यवान साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी रवींद्र रमेश महाजन (३७, रा. जेलरोड) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने १ फेब्रुवारी ते २१जुलै या कालावधीत कॉपर केबल, लोखंडी सेंट्रींग प्लेट, पाण्याची पंप, काँक्र ीट ब्रेकर, काँक्र ीट व्हायब्रेटर आदी ५० हजार रूपये किंमतीचे साहित्य लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.