सरकार, उघड आता देवाचे द्वार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:15 PM2021-08-09T17:15:57+5:302021-08-09T17:16:36+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रावणमास सुरू होऊनही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे खुली करीत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावरच रूद्राभिषेक तसेच घंटा-शंखनाद करीत आंदोलन करण्यात आले. ह्यमंदिर बंद, उघडले बार, उद्धवा...धुंद तुझे सरकारह्ण असे फलक झळकावत व शासनाचा निषेध करीत यावेळी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली असून भाविकांना मंदिर परिसरात गर्दी करण्यास मनाई केली जात आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी भाजपाने यापूर्वी वारंवार आंदोलन केली आहेत. आता श्रावणमास सुरू झाल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे भाविकांना खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरच ठाण मांडत रुद्राभिषेक करीत सरकारला सुबुद्धी सुचावी याकरीता त्र्यंबकराजाला प्रार्थना करण्यात आली. याचवेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शंख व घंटानाद करीत सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात महिलावर्गही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. पंचायती आनंद अखाड्याचे सचिव तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले, एकाच देशात काही राज्यात मंदिरे, धार्मिक स्थळे खुली आहेत तर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ही कुठली अराजकता आहे? सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मंदिर बंद केल्याचे सांगतात. त्यांचे पिताश्री कायम भगवे वस्त्र परिधान करून हिंदू धर्माचे समर्थन करत होते. पण उद्धव ठाकरे यांनी ऐन श्रावण महिन्यात देखील प्रार्थना स्थळे कोविडच्या नावाखाली बंद करून ठेवली आहेत, असे सांगत श्रीमहंत शंकरानंद सरस्वती यांनी संचारबंदीलाही आक्षेप घेतला. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी बॅरिकेडींग केल्याने भाविक व पोलिसांत वादविवादाचेही प्रसंग पाहायला मिळाले. गावात संचारबंदी लागू केली असली तरी सर्व दुकाने सुरू होती.
--------------------
भारतातील अनेक राज्यातील धार्मिक स्थळे उघडली असतांना महाराष्ट्र सरकार धार्मिक, प्रार्थना स्थळे उघडण्यास परवानगी का देत नाही? बियर बार, दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाते, मंदिरे नाही. हा अन्याय सहन केला जाणार नाही. श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात जास्त सणावारांचा, व्रत वैकल्याचा महिना असतांना निदान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल अशी अपेक्षा होती. पण महाराष्ट्र सरकार हिंदुत्व विरोधी असल्याचे यातून स्पष्ट होते.
- आचार्य तुषार भोसले, प्रमुख, भाजपा अध्यात्मिक आघाडी