‘लोकमत’च्या वृत्तानंतर शासन हलले; गजलक्ष्मीवर करणार उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:19 PM2018-05-10T17:19:08+5:302018-05-10T17:19:08+5:30

‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणा-या गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीची माहिती दिली होती.

Government relieved after Lokmat's report; Gajalaxmi treatment! | ‘लोकमत’च्या वृत्तानंतर शासन हलले; गजलक्ष्मीवर करणार उपचार!

‘लोकमत’च्या वृत्तानंतर शासन हलले; गजलक्ष्मीवर करणार उपचार!

Next
ठळक मुद्दे'लोकमत'च्या या वृत्तानंतर वनमंत्रालयानेच दखल घेत लक्ष्मीवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले मुख्य वनसंरक्षक एस. व्ही रामराव यांनी वनमंत्र्यांच्या आदेशानंतर समिती गठित केली मुंबई भायखळा प्राणिसंग्रहालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचारासाठी नाशिकमध्ये येणार

सतीश डोंगरे ।
नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. याप्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीचा सांभाळ करणा-या संबंधिताने तिची योग्य देखभाल न केल्यास त्याचा परवाना रद्द करण्याच्या सूचनाही वनखात्याला दिल्या आहेत.
‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणा-या गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीची माहिती दिली होती. त्याचबरोबर वनविभागाच्या अनास्थेकडेही लक्ष वेधले होते. या वृत्तानंतर प्राणिमित्रांमध्येही लक्ष्मीच्या सुटकेसाठी एकजूट झाल्याचे दिसून आले. ‘आवास’ या प्राण्यांसाठी काम करणाºया संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लक्ष्मीला वाचवा’ या नावाने एक चळवळच उभी केली होती.

ALSO READ : स्वार्थी दुनियादारी : विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश


दरम्यान, लोकमतच्या या वृत्तानंतर वनमंत्रालयानेच याप्रकरणाची दखल घेत लक्ष्मीवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी लोकमतशी बोलताना म्हटले की, लक्ष्मीवर तातडीने योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीने पुढील काळात तिची योग्य ती देखभाल न केल्यास त्याचा परवाना रद्द करण्याबाबतही सरकारी पातळीवर विचार केला जाणार आहे. उपचारासाठी लागणारा निधी सरकारी स्तरावर कमी पडल्यास विशेष कल्याणकारी निधीतून लक्ष्मीवर उपचार केले जातील.

ALSO READ : गजलक्ष्मीच्या सुटकेसाठी आता सोशल चळवळ


दरम्यान, नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही रामराव यांनी वनमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने एक समिती गठित केली असून, त्यामध्ये डॉक्टरांचाही समावेश केला आहे. मुंबई भायखळा येथील प्राणिसंग्रहालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष्मीच्या उपचारासाठी नाशिकमध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगिंतले आहे.

Web Title: Government relieved after Lokmat's report; Gajalaxmi treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.