सरकारी मका खरेदी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 07:33 PM2020-06-27T19:33:40+5:302020-06-27T22:26:40+5:30
लासलगाव : शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन महासंघाच्या माध्यमातून स्थगित केलेली मका खरेदी शुक्र वारी लासलगाव येथील खरेदी विक्र ी संघाच्या गोदामात असलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रावर पुन्हा सुरू झाल्याने मका उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
लासलगाव : शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन महासंघाच्या माध्यमातून स्थगित केलेली मका खरेदी शुक्र वारी लासलगाव येथील खरेदी विक्र ी संघाच्या गोदामात असलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रावर पुन्हा सुरू झाल्याने मका उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यातील मका खरेदीची उिद्दष्ट मर्यादा संपल्याने गेल्या सोमवारी (दि.२२) पासून मका खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शासनाने मर्यादा पुन्हा वाढवून दिल्याने खरेदी प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. राज्याला यापूर्वी २५ हजार मॅट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होत.े आता त्यात ६५ हजार मॅट्रिक टनाची वाढ करण्यात आली आहे. आता उद्दिष्ट वाढल्याने पुन्हा मका खरेदी सुरू झाली असून जिल्ह्यात नोंदणी केलेल्या साडेपाच हजार शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.
महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे चांगल्या प्रतीचा मका भरपूर प्रमाणात शिल्लक असून तो विक्र ी अभावी तसाच पडेल या चिंतेने मका उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे तसेच खासदार डॉ. भारती पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर त्यांनी केंद्राकडे या बाबत तातडीने पाठपुरावा करून ही मका खरेदीची मर्यादा वाढवून घेतली आहे.
केंद्रातील सार्वजनिक अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्याला ६५ हजार मे. टन मका खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात आली असून मका खरेदीसाठी शेतकºयांना १५ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मका खरेदीस केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला ६५ हजार मे. टन खरेदीस मर्यादा वाढवून दिल्याबद्दल मका उत्पादक शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी (दि.२५) व शुक्रवारी (दि.२६) येथील शासकीय मका खरेदी केंद्रात सरासरी ३१०० क्विंटल मक्याची आवक झाली आहे.