शासनाने संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:32+5:302020-12-23T04:12:32+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री कक्षात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याबाबत परिपत्रक ...
विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री कक्षात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याबाबत परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये संत नरहरी महाराज व नाना शंकरशेट यांचा कोठेही उल्लेख नाही. संस्थेने यापूर्वीही वरील मागण्या केल्या होत्या. दहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू असूनही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. हा बहुजन समाजाचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावार दिलीपशेठ शहाणे, भगवान थोरात, मनोज कपोते, सुनील माळवे, सुभाष शहाणे, शरद माळवी, प्रकाश भडकवाडे, प्रदीप कपोते, मंगेश चित्ते, उमेश सोनार, चंद्रशेखर उदावंत, सारिका नागरे, प्रमोद काशीकर आदींच्या सह्या आहेत.