शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 01:40 AM2020-09-18T01:40:53+5:302020-09-18T01:43:17+5:30

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद

The government should make onions feel free | शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे

शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे

Next
ठळक मुद्देआज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल

नाशिक- लॉकडाउननंतर प्रथमच कांद्याला थोडाफ़ार भाव मिळू लागला असतानाच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद ....

प्रश्न : निर्यातबंदी निर्णयाचे काय परिणाम होतील ?

बोराडे : या निर्णयामुळे कंद्याचे भाव तर कोसळतीलच पण त्याच बरोबर अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल . निर्यात कमी झाल्यास त्याचा मोठा फ़टका शेती क्षेत्राला बसेल . शासनाच्या धोरणामुळे आधीच भारतीय मालाची मागणी चाळीस टक्क्यांनी घटली आहे.

प्रश्न : कांदा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी साठी काय सुचवावेसे वाटते ?


बोराडे : देशात कांद्याचे भाव वाढले की, शासन निर्यातबंदी करते हे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक भाव वाढ कायम रहात नाही तर एक दोन महीने असते . तेवढा वेळ ग्राहक समजून घेतात . या काळात शासनाने कांदा खरेदी करून तो ग्राहकांना फुकट वाटावा पण कोणत्याही परिस्थितीत निर्यात बंद करू नये हाच यावरील कायमचा उपाय आहे.

प्रश्न : सध्या कांद्याला जास्त भाव मिळाले असे सांगितले जाते. मात्र, आता मिळणारा भाव तरी शेतकऱ्यांना परवडतो का ?


बोराडे : आज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकुनही शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत नाही . विविध नैसर्गिक अपत्तिमध्ये शेतकरयांचे मोठे नुकसान होते त्या वेळी कुणी त्यांना विचारत नाही आणि भाव वाढले की सर्वांच्या भुवया उंचावतात हे चुकीचे आहे . हा शेतकरयांवर मोठा अन्याय आहे.

मुलाखत- संजय दूनबळे

Web Title: The government should make onions feel free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.