गोदावरी नदीवरील पुलांना शासनाची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:28+5:302020-12-25T04:13:28+5:30
नाशिक- गंगापूररोडवर गोदावरी नदीवरील अगोदरच्या दोन पुलांचा पुरेसा वापर होत नसताना आता आणखी पूल बांधण्याचा घाट सत्तारूढ भाजपने घातला ...
नाशिक- गंगापूररोडवर गोदावरी नदीवरील अगोदरच्या दोन पुलांचा पुरेसा वापर होत नसताना आता आणखी पूल बांधण्याचा घाट सत्तारूढ भाजपने घातला असून त्यास चव्हाण कॉलनी येथील रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. आता राज्य शासनाने या पुलास गुरुवारी (दि.२४) स्थगिती दिली आहे. आक्षेप घेणाऱ्यांना रीतसर सुनावणी देऊन मग त्यावर शासन निर्णय घेणार आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कार्यवाही केली आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात दाखल याचिकेत गेल्या १७ डिसेंबर रोजी निकाल दिला आहे. न्यायमूर्ती एस.जे. काथावाला आणि छागला यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाने महापालिका आयुक्तांना यासंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर नगरविकास मंत्री सुनावणी घेणार आहेत. तोपर्यंत पुलाच्या कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. कक्ष आधिकारी सु.द.धांडे यांनी यासंदर्भात गुरूवारी (दि.२४)महापालिकेला पत्र पाठवले आहे.
गोदावरी नदीवर आसाराम बापु आश्रमाजवळील पुल आणि त्यानंतर फॉरेस्ट नर्सरी पुल आणि त्याही पुुढे इंद्रप्रस्थ पुल असून आता या तीन पुलांच्या जोडीला आणखी तीन पुल बांधण्याचे घाटत आहे. या मार्गावर केाणतीही रहदारी नाही की तशी स्थानिकांची मागणी देखील नाही असे असताना देखील हा पुल बांधण्याचे घाटत असल्याने त्यावरून बराच वाद निर्माण झाला. महापालिकेत भाजपची सत्ता असताना देखील आमदार देवयानी फरांदे यांनी या पुलास विरोध केला आणि या पुलामुळे नदीप्रवाहास अडथळा हेाणार असून पुराचा धेाका कमी होण्यापेक्षा अधिकच वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतरही पुल मंजुर करून निविदा मागवण्यात आल्या. त्यानंतर स्थानिक रहीवाशांनी त्यास विरोध केला होता. संबंधीत नागरीकांच्या वतीने प्रकाश दादासाहेब सानप यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्याच अनुषंघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
इन्फो...
काय आहे रहिवाशांचा आक्षेप?
१ नदीवर अगोदरच तीन पुला आहेत. त्यात आणखी पुल बांधल्यास गोदावरी नदीची पूरपातळी वाढणार आहे. त्याचा नदीकाठच्या घरांना धोका असून नागरिकांच्या घरात पाणी शिरू शकते.
२ पंधरा मीटर पुलाला मनपाने तीस मीटर केले, त्यानंतर निविदा काढताना आठ मीटर पूल दर्शवला. त्यामुळे एकूणच कामात तांत्रिक गेांधळ आहे.
३ या पुलालगतचा रस्ताही चुकीचा आहे. तीस मीटर रस्त्याला झेड असे वळण देण्यात आले असून, तेदेखील अत्यंत धोकादायक आहे.