आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य
By Sandeep.bhalerao | Updated: October 19, 2023 18:48 IST2023-10-19T18:47:31+5:302023-10-19T18:48:13+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेवर विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.

आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेवर विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रांजेद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्यानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेकरीता कुलपती यांच्याकडून नामनिर्देशन करण्यात येते. या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेवर पुण्याचे डॉ. नरेंद्र पटवर्धन यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. नागपूर विभागातून डॉ. मनिषा उपेंद्र कोठेकर, मराठवाडा विभागातून औरंगाबादचे डॉ. विलास दत्तोपंत वांगिकर, पश्चिम महाराष्ट्र विभागातून सातार्याचे डॉ. मनिष विलास इनामदार, कोकण विभागातून डॉ. वर्षा दिलीप फडके यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. तसेच पुण्याचे डॉ. नरेंद्र पटवर्धन यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.
विद्यापरिषदेवर विद्यापीठ मुंबईच्या डॉ. निलिमा अरुण क्षीरसागर, मुंबईचे डॉ. श्रीराम शेेषगिर सावरीकर यांचे कुलपती यांनी नामनिर्देशित करण्यात आले आहे. नामनिर्देशित सदस्यांचे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अभिनंदन केले आहे.