मांजरपाड्याची राज्यपालांनी घेतली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:42 AM2017-08-24T00:42:40+5:302017-08-24T00:42:45+5:30

 The governor of the Cathedral took information | मांजरपाड्याची राज्यपालांनी घेतली माहिती

मांजरपाड्याची राज्यपालांनी घेतली माहिती

googlenewsNext

नाशिक : गोगुळ गावाजवळ सुमारे तीन हजार मीटरचे धरण बांधून त्यातील पाणी चणकापूर धरणात सोडण्याच्या मांजरपाडा दोन प्रकल्पाची महत्त्वाची बैठक बुधवारी (दि.२३) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे झाल्याची माहिती आमदार डॉ. राहुल अहेर व माजी सभापती केदा अहेर यांनी दिली.
जिल्'ाचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार डॉ. राहुल अहेर यांनी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्याकडे नाशिक जिल्'ातील मांजरपाडा दोन प्रकल्प तसेच जळगाव जिल्'ातील सिंचन प्रकल्पाबाबत वेळ मागितली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२३) ही बैठक झाली. सुरगाणा तालुक्यातील गोगुळ या गावी ३ हजार २०० मीटरचे धरण उभारून त्यातील पाणी कालव्याद्वारे चणकापूर धरणात सोडून नंतर ते पाणी गोदावरी खोºयात वळविण्याची मांजरपाडा दोन ही वळण योजना सुधारित प्रशासकीय मंजुरीसाठी राज्यपालांकडे विशेष बाब म्हणून सादर करण्यात आली आहे. या योजनेची जलसंपदाच्या अधिकाºयांकडून सविस्तर माहिती राज्यपालांनी घेतली. मांजरपाडा दोन प्रकल्पात ८ किलोमीटरचा कालवा व ११ किलोमीटरच्या बोगद्यातून पाणी कळवण तालुक्यातील चणकापूर धरणापर्यंत पोहोचविले जाणार आहे. सुमारे ५३४ कोटींची ही वळण योजना असून राज्यपालांनी ही योजना विशेष बाब म्हणून मंजूर करावी, यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन दिले आहे. या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळण्याआधी या योजनेची विस्तृत माहिती राज्यपालांनी घेतली. आता लवकरच या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यास कसमादेचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिली.

Web Title:  The governor of the Cathedral took information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.