राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर
By admin | Published: January 30, 2015 12:42 AM2015-01-30T00:42:15+5:302015-01-30T00:42:25+5:30
राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर
नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे उद्या (दि. ३०) नाशिक दौऱ्यावर मुक्कामी येत असून, त्यांच्या उपस्थितीत शहर व ग्रामीण भागास भेट व यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठात पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बैठक घेणार आहेत.
शुक्रवार, दि. ३० रोजी सकाळी दहा वाजता राजभवनातून त्यांचे नाशिकसाठी हेलिकॉप्टरने प्रयाण होऊन बरोबर १० वाजून ३५ मिनिटांनी ते मुक्त विद्यापीठात तयार केलेल्या हेलिपॅडवर त्यांच्या हेलिकॉप्टरचे आगमन होईल. त्यानंतर थोडावेळ विश्रामगृहावर आराम केल्यानंतर अकरा वाजता मुक्त विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला त्यांची उपस्थिती, दुपारी बारा (पान ७ वर)
ते एक दरम्यान पेसा कायद्याबाबत बैठक त्यानंतर एक ते दुपारी सव्वादोन भोजन व आराम दुपारी सव्वादोन वाजता मोटारीने नागलवाडी (नाशिक) येथे अंगणवाडी, प्राथमिक शाळा व पाहणी दुपारी साडेतीन ते चार आदिवासी योजनांबाबत चर्चा, साडेचार वाजता धोंडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी, सव्वापाच वाजता पेठ रोडवरील एकलव्य प्रशिक्षण केंद्रास भेट, पावणे सहा वाजता पेठरोडवरून मुक्त विद्यापीठाकडे प्रयाण, सव्वासहा वाजता मुक्त विद्यापीठात आगमन व नंतर विश्राम. शनिवार, दि.३१ रोजी नऊ वाजता सकाळी मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्राला भेट व पाहणी. साडेनऊ वाजता मुक्त विद्यापीठातील हेलिपॅडवरून नंदुरबार येथील दौऱ्यासाठी प्रयाण, असा राज्यपालांचा दौरा आहे. राज्यपाल दिवसभर मुक्कामी असल्याने शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे.(प्रतिनिधी)