राज्यपाल यांचा नियोजित सटाणा दौरा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:21 AM2020-12-22T00:21:06+5:302020-12-22T00:23:21+5:30

सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच जिल्ह्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्यपाल कोशारी यांचा नियोजित दौरा रद्द न करता स्थगित करण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर नववर्षात राज्यपाल कोश्यारी येणार असल्याची माहिती सटाणा शहराचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

Governor's planned visit to Satana postponed | राज्यपाल यांचा नियोजित सटाणा दौरा स्थगित

राज्यपाल यांचा नियोजित सटाणा दौरा स्थगित

Next
ठळक मुद्देनिवडणुकीची आचारसंहिता : नववर्षात होणार भूमिपूजन

सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच जिल्ह्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्यपाल कोशारी यांचा नियोजित दौरा रद्द न करता स्थगित करण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर नववर्षात राज्यपाल कोश्यारी येणार असल्याची माहिती सटाणा शहराचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सोमवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता देवमामलेदारांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित रहाणार होते. नियोजित स्मारकस्थळी भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर नजीकच असलेल्या दगाजी सिनेमा पॅलेस येथे मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शहरात पालिका व प्रशासनाने व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ट्रस्टने जय्यत तयारी सुरू केली होती. शहर नववधूप्रमाणे सजू लागले होते. प्रत्यक्ष स्मारक परिसर, तसेच समारंभस्थळाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी, होर्डिंग्ज, मंदिर सजावट याची तयारी सुरू होऊन पोलीस प्रशासनने बंदोबस्त वाढवत आढावा सुरू केला होता. दरम्यान, सोमवारी (दि. २१) नगराध्यक्ष सुनील मोरे यांना मुंबई येथील राजभवन येथे बोलावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा नाशिक जिल्ह्यासह बागलाणमधील ४० ग्रामपंचायतींची निवडणूक आचारसंहिता असल्याने दि. २८ रोजीचा दौरा स्थगित करण्यात आला असून आचारसंहिता संपल्यानंतर नववर्षात राज्यपाल महोदय सटाणा येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कामे सुरूच राहणार
राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन नववर्षात होणार असले तरीही स्मारक भूमिपूजनची निगडित सर्व कामे रद्द न करता सुरू ठेवून आचारसंहिता संपल्यानंतर लगेच तारीख घेऊन दौरा आखण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली आहे.

Web Title: Governor's planned visit to Satana postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.