गोविंदा आला रे...
By Admin | Published: August 26, 2016 12:21 AM2016-08-26T00:21:53+5:302016-08-26T00:40:54+5:30
जालना: शहरासह जिल्ह्यात दहीहंडी उत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणार्इंने यात पुढाकार घेतल्याने शहर ‘गोविंदा रे गोपालाने’ दुमदुमून गेले होते
जालना: शहरासह जिल्ह्यात दहीहंडी उत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणार्इंने यात पुढाकार घेतल्याने शहर ‘गोविंदा रे गोपालाने’ दुमदुमून गेले होते. शहरातील प्रमुख चौकांत दहीहंडी फोडून जल्लोष करण्यात आला. अंबड, भोकरदन,मंठा, परतूर, बदनापूर, घनसावंगी येथे दहीहंडी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.
गोकुष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी केली जाते. शहरातील कृष्ण मंदिरांसोबतच सेवाभावी संस्था व राजकीय पक्षांनीही यंदा दहीहंडी कार्यक्रमासाठी मोठा पुढाकार घेतल्याचे दिसून आले. जुना जालन्यात गवळी समाजाच्या वतीने श्रीकृष्णाच्या प्रतिमेची ढोलताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली.
लाड गवळी समाजाच्या वतीनेही दहीहंडी उत्साहात पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. सजविलेलया वाहनात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भजनी मंडळानेही भजने सादर केली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. प्रथेप्रमाणे ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकी दरम्यान दहा ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. यात प्रामुख्याने गणपती चौक, गणपती मंदिर, शास्त्री मोहल्ला बाजार चौकी, आनंदीस्वामी गल्ली आणि गवळी पंचायत वाड्यात दहीहंडी फोडनू गोपाळकाला करण्यात आला. यावेळी लाड गवळी समाजाचे अध्यक्ष जगन्नाथ गोगडे, सचिव सुनील सतकर, भजनाचे प्रमुख दशरथ सुपारकर, गणेश सुपारकर, गणेश लाड, रवी लाड, कैलास लाड, बालाजी लाड, गणेश सुपारकर, लखन वाघमारे, महेश गोगडे, अक्षय सतकर, अनिल गोगडे, राजेश सतकर, उमेश गोगडे, आदर्श सतकर, शुभम वाघमारे, राहुल सुपारकर यांच्यासह शेकडो समाजबांधवांनी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणपती गल्ली चौकांतही गणेश सुपारकर मित्र मंडळाच्या वतीने मोठी दहीहंडी फोडण्यात आली. कोळेश्वर गल्ली भागातही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संतोष रेगुडे, गणेश जोशी, अमोल देशमुख, गणेश लोखंडे, ऋषभ खेरूडकर, अनिकेत साहनी, अजिंक्य कोळेश्वर, प्रथमेश शहाणे यांच्यासह महिला मंडळ तसेच रहिवाशांची मोठी उपस्थिती होती. नवीन जालना भागातील नंदी मंदिरात मोठी दहीहंडी पारंपरिक उत्साहात फोडण्यात आली. भाविकांना गोपाळकाला वाटण्यात आला. बडीसडक, शिवाजी पुतळा, मोदीखाना, कॉलेज रोड आदी ठिकाणी डीजेच्या तालावर दहीहंडी फोडण्यात आली. मोहिनी चौकात पद्मशाली युवा मंचच्या वतीने दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी गणेश वल्लाकट्टी, आशीष संभार, छोटू चित्राल, बालाजी गुडूर, सुरेश संभार, शशी ऐटला, शंकर दुडका यांच्यासह सदस्यांची मोठी उपस्थिती होती.
भोकरदन शहरातही दहीहंडीचा कार्यक्रम गुरूवारी उत्साहात पार पडला. सायंकाळी युवकांनी एकत्र येत गोविंदाचा गजर करीत दहीहंडी फोडली. शहरातील विविध भागात गोपाळ्या काल्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला.
अंबड शहरातील दहीहंडीचा मोठा उत्साह दिसून आला. मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातही विविध कार्यक्रम पार पडले.
जालना शहरातील कन्हैयानगरातील श्री कृष्ण हिंदी विद्या मंदिरात दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी विनोद यादव, योगेश भगत, प्रदीप दांडगे, गोकूळ संैदर आदींची उपस्थिती होती. गांधी चमन परिसरातील किडस केंब्रिज शाळेत दहीहंडी पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची वेशभुषा परिधान केली होती. यावेळी संचालिका अलका गव्हाणे यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नजिक पांगरी येथील कै.नानासाहेब पाटील विद्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याध्यापक वाघ यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.