‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:54 AM2019-08-25T00:54:48+5:302019-08-25T00:55:09+5:30
शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये शनिवारी (दि.२४) ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड अशा उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात पार पडला. दरम्यान, काही मंडळांनी यंदा दहीहंडीचा उपक्र म रद्द करून त्यासाठी जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे.
नाशिक : शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये शनिवारी (दि.२४) ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड अशा उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात पार पडला. दरम्यान, काही मंडळांनी यंदा दहीहंडीचा उपक्र म रद्द करून त्यासाठी जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे.
विविध वयोगटांतील दहीहंडीप्रेमींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंचवटी, सिडको, गोदाघाट येथील मंडळांनी आपापल्या भागात लहान-मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले होते. शहर व परिसरात दहीहंडीचा उपक्र म प्रामुख्याने काही शाळांमध्ये उत्साहात साजरा झाला. रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेत नागरिकांनी उत्सवाचा आनंद लुटला. शहरात काही मंडळांनी या उपक्र माचे आयोजन केले.
दहीहंडी फोडण्यात यशस्वी झालेल्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, काही शाळांना कलाष्टमीची सुटी होती, तर काही शाळांमध्ये दहीहंडीची जय्यत तयारी दिसून आली. शाळेतील सभागृहात वा मोकळ्या मैदानात दहीहंडीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा व गोपाळासारखे गीते सादर केली. शिक्षकांच्या मदतीने ठिकठिकाणी बाळगोपाळांनी दहीहंडी फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. बाळगोपाळांनी नृत्य, खेळाच्या माध्यमातून आनंद लुटला.
दरम्यान, सिडको परिसरातील मोरवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी आणि गोपालकाला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
इस्कॉन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा
४द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे शनिवारी (दि.२४) रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली.
४सकाळी मंगल आरती, महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद् भागवत प्रवचन-कीर्तन रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर नऊ ते रात्री अकरापर्यंत महाभिषेक करण्यात आला.
४साडेअकरा ते १२ वाजेपर्यंत महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव इस्कॉन मंदिरात साजरा करण्यात येत आहे. तसेच रविवारी (दि.२५) संध्याकाळी ७ वाजेपासून रात्रीपर्यंत नंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
४जन्माष्टमीनिमित्त मंदिर पूर्णवेळ भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. ‘हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे..’चा जयघोषाने मंदिर दुमदुमले होते.