गोविंदनगर  जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:55 PM2019-05-10T23:55:46+5:302019-05-11T00:05:33+5:30

आरोग्य चांगले राहावे यासाठी गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी असंख्य नागरिक दररोज हजेरी लावतात; परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ट्रॅकची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली

 Govindnagar jogging track drought | गोविंदनगर  जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था

गोविंदनगर  जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था

Next

सिडको : आरोग्य चांगले राहावे यासाठी गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी असंख्य नागरिक दररोज हजेरी लावतात; परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ट्रॅकची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली असून, ट्रॅकच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तसेच खडी व डेब्रिज पडलेले असल्याने हा जॉगिंग ट्रॅक नव्हे तर कचºयाचे आगर असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
महापालिकेच्या वतीने गोविंदनगर ते कर्मयोगी चौक या भागात जॉगिंग ट्रॅक तयार केला असून, दिवसभर उन्हामुळे घराबाहेर पडता येत नसले तरी या ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास असंख्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक फिरावयास येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून मनपाच्या दुर्लक्षामुळे ट्रॅकची दयनीय अवस्था झाली असून, ट्रॅकवर पाणी मारले जात नाही, तसेच साफसफाई केली जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सदाशिवनगर ते कर्मयोगी चौक दरम्यान असलेल्या ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा पडलेला असून, ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. यातच याच ट्रॅकवर माती, दगड तसेच डेब्रिज मोठ्या प्रमाणात पडलेले असून, याकडेदेखील मनपाचे लक्ष नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या संपूर्ण ट्रॅकची अवस्था बिकट झाली असून, मनपाने त्वरित सुधारणा करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
वाहनधारक त्रस्त
गोविंदनगर बोगदा ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर हातगाडीचालक तसेच इतर व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण वाढले आहे. येथील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाकडून लक्ष देले जात नसल्याने याचा त्रास नागरिकांना तसेच वाहनधारकांना होत आहे.
४गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर असलेल्या झाडांचा पालापाचोळा ट्रॅकवर साचत असून, काही काटेरी झाडे असल्याने त्यांच्या फांद्यादेखील ट्रॅकवर पडत असल्याने याचा फिरावयास येणाºया नागरिकांना त्रास होताना दिसून येत आहे. मनपाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Web Title:  Govindnagar jogging track drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.